New News Website https://mahasattabharat.com Sun, 14 Apr 2024 05:12:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.2 181517680 ‘त्यानं’ चिमुकल्याला ज्यूसमधून दिलं विष ; ‘तिच्या’ डोक्यात हातोडा घातला आणि स्वतः गळफास घेतला ; शनिवारच्या घटनेनं नागपूरसह महाराष्ट्र प्रचंड हादरला…! https://mahasattabharat.com/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82/ https://mahasattabharat.com/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82/#respond Sun, 14 Apr 2024 05:05:48 +0000 https://mahasattabharat.com/?p=38767 ‘तो’ एक ड्रायव्हर होता. त्याला एक पत्नी होती तिच्यापासून दोन मुलंदेखील झाली आहेत. मात्र एका लग्नसमारंभात त्याला ‘ती’ भेटली आणि दोघांचं सूत जुळलं. त्यांनी लग्नदेखील केलं. मात्र काही वर्षांनी ‘ती’ त्याला प्रतिसाद देत नव्हती.

मग त्यानं तिची माहिती घ्यायला सुरुवात केली. ती माहिती घेत असताना त्याला तिचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण लागली. त्यानं तिला चिमुकल्यासह एका हॉटेलवर बोलवलं.
चिमुकल्याला ज्यूसमधून विष दिलं. तिच्या डोक्यात दगड घातला आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. काल अर्थात दि
13 सायंकाळी नागपुरातल्या एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र प्रचंड हादरला आहे.

ड्रायव्हर सचिन राऊत (रा. दिनननगर, इसासनी), त्यांची दुसरी पत्नी नाजनिन सचिन राऊत (एकात्मता नगर) आणि चिमुकला युग राऊत अशी मृतांची नावं आहेत. ड्रायव्हर सचिन राऊत हा मध्यप्रदेशमध्ये एका नातेवाईकाच्या लग्नाला गेला होता. तिथं त्याला नाजनिन भेटली. तो तिच्या प्रेमात पडला. दोघांनी लग्न केलं. मात्र ही बाब त्याच्या पहिल्या पत्नीला माहित नव्हती.

पोलिसांनी हॉटेलमधल्या रूमची तपासणी केली असता मोठा धक्कादायक प्रकार समोर आला. चिमुकल्या यशच्या तोंडातून फेस आला होता. तर नाजनिनच्या डोक्यात हातोडा मारल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांना त्या ठिकाणी करारनामादेखील आढळून आला.

नाजनिनशी संबंध तोडत असून चिमुकल्या युगची जबाबदारीदेखील नाजनिनवर टाकत असल्याचं त्या करारनाम्यात म्हटलं आहे. ड्रायव्हर सचिन राऊतनं आत्महत्या केल्याची माहिती नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे यांना देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी हॉटेलच्या रुमचा दरवाजा तोडून मृतदेह पोस्टमार्टमसाठी परवाना केले. दरम्यान, या घटनेप्रकरणी खून आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

]]>
https://mahasattabharat.com/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82/feed/ 0 38767
93 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोने आणि रोख रक्कम जप्त ; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई https://mahasattabharat.com/93-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%96-50-%e0%a4%b9%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8/ https://mahasattabharat.com/93-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%96-50-%e0%a4%b9%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8/#respond Sat, 13 Apr 2024 15:38:02 +0000 https://mahasattabharat.com/?p=38763 राज्य निवडणूक आयोग तसंच जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी घालून दिलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणत्याही इसमाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त अधिक रक्कम जवळ बाळगता येत नाही. 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळून आल्यास जिल्हाधिकारी आणि निवडणुक आयोग यांना सुचित करावं लागतं, याबाबत तसे आदेश आहेत.

दरम्यान, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, रमेशसिंह हेरसिंह राजपूत (रा. राजस्थान) हा कोणतंही अधिकृत बील नसतांना त्याच्या कब्जामध्ये सोन्याचे दागिने बाळगून ते विक्री करण्याकरीता त्याच्या एका साथीदारासह अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यामध्ये आला असून ते सध्या (तुलसी विहार लॉजिंग, माणिकचौक, अहमदनगर) येथे थांबलेला आहे.

या बातमीची हकिगत पोनि. दिनेश आहेर (स्थानिक गुन्हे, शाखा अहमदनगर) यांना कळविली असता त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि तुषार धाकराव, मनोहर शेजवळ, रविंद्र कर्डिले, शिवाजी ढाकणे, रविंद्र घुंगासे, संतोष खैरे, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करुन बातमीतल्या ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन पथकाला रवाना केलं.

वरील पोलीस पथकातल्या अधिकारी
आणि पोलीस अंमलदार यांनी तुलसी विहार लॉजिंग (माणिक चौक, अहमदनगर) येथे जाऊन खात्री केली असता सदर लॉजमध्ये रमेशसिंह हेरसिंह राजपूत (वय 47 वर्षे, रा. बायोसा गल्ली, बेडा, बेरा, पाली, राजस्थान), नारायणलाल हेमराज गाडरी (वय – 27 वर्षे, रा. गाडरी मोहल्ला, धना की, भागल, ताना, चित्तौडगढ, आकोला, राजस्थान) असे सोन्याचे विविध दागदागिने व रोख रकमेसह मिळून आले.

रमेशसिंह हेरसिंह राजपूत याच्या कब्जामध्ये 91 लाख 78 हजार 897/- रुपये किंमतीचे 1311.28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने तसेच 3 लाख 47 हजार रुपये रोख रक्कम आणि नारायणलाल हेमराज गाडरी याच्या कब्जामध्ये 1 लाख 36 हजार 500 रुपये किंमतीचे 19.500 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे या दोन्ही इसमांकडे एकूण 93 लाख 15 हजार 397 रुपये किंमतीचे 1330.78 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 34 हजार 700 रुपये रोख रक्कम असा एकूण 93 लाख 50 हजार 097 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.

या दोन्ही इसमांकडे त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या दागिण्यांचे अधिकृत बिलाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्याकडे कोणतंही अधिकृत बिले सोबत नसल्याचं सांगितलं. सदरचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पंचनामा करुन ताब्यात घेण्यात आली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या सोन्याचे दागिने आणि रोख रकमेबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अहमदनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर आणि उपायुक्त आयकर विभाग अहमदनगर यांना पुढील कार्यवाही होणेबाबत विनंती करण्यात आली आहे.

सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली.

]]>
https://mahasattabharat.com/93-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%96-50-%e0%a4%b9%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8/feed/ 0 38763
भूमिका बदलली नाही ; तर कुठल्याही मोबदल्याशिवाय सरकारवर टीका करण्याचं ते धोरण होतं : मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती ; पत्रकार परिषदेत जाहीर केली भूमिका…! https://mahasattabharat.com/%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a0%e0%a4%b2/ https://mahasattabharat.com/%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a0%e0%a4%b2/#respond Sat, 13 Apr 2024 13:21:38 +0000 https://mahasattabharat.com/?p=38758 ‘मला राज्याचं मुख्यमंत्री हवं आहे, माझे 40 आमदार फोडले, म्हणून मी राज्य सरकारवर टीका करत नव्हतो. तर त्यावेळची परिस्थिती तशी होती. काही लोक म्हणताहेत, की राज ठाकरे यांनी भूमिका बदलली. मात्र भूमिका बदलली नाही. तर कुठलाही राजकीय मोबदला न घेता राज्य सरकारवर टीका करण्याचं धोरण बदललंय’, अशी स्पष्टोक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी दिली. मुंबईत बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी त्यांची भूमिका आज (दि. १३) जाहीर केली.

ते म्हणाले, ‘टीका करत असताना पुढच्या पाच वर्षांत ज्या चांगल्या गोष्टी झाल्या, त्याचं स्वागतदेखील मी केलं आहे. उदाहरणार्थ 370 कलम रद्द होणं, राम मंदिरासारखा विषय. धर्माच्या नावावर आपल्याला काही राष्ट्र उभं करायचं नाही. परंतू 1992 ते 2024 पर्यंत रखडलेली एक गोष्ट मार्गी लागली. त्यामध्ये अनेक कारसेवकांनी जीवनाची आहुती दिली आहे. अनेक कार सेवकांना त्यावेळी गोळ्या घालण्यात आल्या. त्यांची प्रेतं शरयू नदीत टाकून देण्यात आली होती. मात्र राम मंदिर झाल्यामुळे त्या कार सेवकांचे आत्मे शांत झाले असतील, असं मला वाटतं.

सुप्रीम कोर्टानं जरी राम मंदिरासंदर्भातला आदेश दिला असला आणि जर नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं. एन आर सी चा विषय, राम मंदिराचा विषय, 370 कलम हटवण्याचा विषय अशा अनेक गोष्टींवर मी त्यावेळी स्वागत केलं आणि नरेंद्र मोदी यांना फोन करून त्यांचं अभिनंदनदेखील केलं. एका बाजूला धडबुजरं कडबोळं आणि दुसऱ्या बाजूला खंबीर नेतृत्व अशा परिस्थितीत मोदींना साथ देणं, हे आवश्यक वाटतं म्हणून आमच्या पक्षानं असं ठरवलं, की नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची संधी द्यावी, यासाठी त्यांना पाठिंबा देण्याचा हा निर्णय घेतला.

महाराष्ट्राच्या ज्या काही मागणी आहेत, त्या त्यांच्यापर्यंत जातील आणि त्या पूर्णदेखील होतील, अशी अपेक्षा आहे. या अपेक्षांमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचं संवर्धन अशा अनेक अपेक्षा आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे असल्यामुळे त्यांना गुजरात राज्याविषयी जास्त आपुलकी असणं स्वाभाविक आहे. कारण ते गुजराती आहेत. मात्र देशातली अन्य राज्यंदेखील त्यांनी अपत्याप्रमाणं जपावीत, महाराष्ट्राचा औद्योगिक विकास करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल, असा विश्वास वाटतो आहे.

… आणि राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून घेतला काढता पाय…!

या पत्रकार परिषदेचे ‘ब्रिफिंग’ केल्यानंतर राज ठाकरे यांना उपस्थित पत्रकारांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरं राज ठाकरे यांनी त्यांच्या खास स्टाईलमधून दिलीसुध्दा. पण उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारताच त्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. त्यानंतर कुठल्याही प्रश्नाला उत्तरं न देता ते निघून गेले.

]]>
https://mahasattabharat.com/%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a0%e0%a4%b2/feed/ 0 38758
‘पुण्य कर्माच्या मोबदल्यात स्वर्गप्राप्ती करुन देतो’, असं सांगून एका डॉक्टरला चक्क 5 कोटी 38 लाखांना लुटलं…! https://mahasattabharat.com/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af/ https://mahasattabharat.com/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af/#respond Sat, 13 Apr 2024 10:07:27 +0000 https://mahasattabharat.com/?p=38754 धर्म, पाप, पुण्य या सर्व गोष्टी फक्त गरिबांनाच प्रभावित करतात, असं नाही. तर व्यवसायानं डॉक्टर असलेल्या व्यक्तीलासुद्धा याचा प्रभाव वाटू लागतो. पुण्यातल्या कोंढवा परिसरात एका डॉक्टरला काही संधीसाधू आणि भोंदू लोकांनी पुण्य कर्माद्वारे स्वर्गप्राप्ती करून देतो, असं सांगून 5 कोटी 38 लाख रुपयांना गंडवलं आहे.

याप्रकरणी डॉ. अहमद अली इनाम अली कुरेशी (रा. मेफेयर एलिगंझा, एन. आय. बी. एम. रोड कोंढवा, पुणे) यांनी फिर्याद दिली. डॉक्टर कुरेशी आणि सादिक अब्दुल मजीद शेख, यास्मिन सादिक शेख, एतेशाम सादिक शेख (रा. हार्मनी सोसायटी, कोंढवा, बिबवेवाडी रोड, गुलटेकडी, पुणे) आणि राज आढाव उर्फ नरसू यांचा एकमेकांशी परिचय होता.

आरोपी सादिक शेख, त्याची पत्नी यास्मिन आणि इतरांनी डॉक्टर कुरेश यांच्याशी गोड गोड बोलून धर्म, पाप, पुण्य आणि स्वर्गप्राप्ती याविषयी डॉ. कुरेशी यांना सांगून त्यांचा ‘ब्रेन वॉश’ केला. डॉ. कुरेश यांच्या वेगवेगळ्या मालमत्तांची 11 बक्षीसपत्रं तयार करून ही मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील हे पुढील तपास करत आहेत.

]]>
https://mahasattabharat.com/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af/feed/ 0 38754
अर्बन बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ‘त्या’ दहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल…! https://mahasattabharat.com/%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ac%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a5%88%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5/ https://mahasattabharat.com/%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ac%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a5%88%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5/#respond Sat, 13 Apr 2024 08:11:13 +0000 https://mahasattabharat.com/?p=38751 नगर अर्बन बँकेच्या 291 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केलेल्या दहा जणांविरुद्ध 90 दिवसांच्या मुदतीपूर्वीच दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेनं कोर्टात दाखल केलेलं हे दोषारोपपत्र 8 हजार पानांचं आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं आतापर्यंत नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहारात दहा जणांना अटक केली आहे. त्या दहा जणांविरुद्ध हे दोषारोपत्र दाखल करण्यात आलं आहे.

प्रदीप जगन्नाथ पाटील, राजेंद्र शांतीलाल लुणिया, मनीष दशरथ साठे, अनिल चंदूलाल कोठारी, अशोक माधवलाल कटारिया, शंकर घनश्यामदास अंदानी, मनोज वसंतलाल फिरोदिया, प्रवीण सुरेश लहारे, अविनाश प्रभाकर वैकर, अमित वल्लभभाई पंडित अशा दहा जणांविरुद्ध हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

नगर अर्बन बँकेतल्या 291 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आर्थिक गैरव्यवहारामुळे 110 वर्षांची जुनी असलेली ही बँक बंद पडली असून अनेक ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या बँकेत अडकल्या आहेत.

]]>
https://mahasattabharat.com/%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ac%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%97%e0%a5%88%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5/feed/ 0 38751
पुण्याच्या येरवड्यात हे काय घडलंय भलतंच ; वाचल्यानंतर तुम्हीही चक्रावून जाल…! https://mahasattabharat.com/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b9%e0%a5%87/ https://mahasattabharat.com/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b9%e0%a5%87/#respond Sat, 13 Apr 2024 04:57:59 +0000 https://mahasattabharat.com/?p=38748 एकेकाळी विद्येचं माहेरघर असलेलं पुणे आता गुन्हेगारांचा अड्डा होतो की काय, अशी भीती पुणेकरांच्या मनात निर्माण झाली आहे. यापूर्वी मुंबई ही  गुन्हेगारांची कर्मभूमी होती. पण आता पुणे गुन्हेगारांचा अड्डा होऊ पाहतो आहे. तुम्ही म्हणाल, हे असं पुण्याबद्दल बोलणं योग्य आहे का ? पण त्या मागच्या कारणही तसंच आहे. शेवटपर्यंत वाचा आणि जाणून घ्या, काय झालंय पुण्यातल्या येरवड्या…!

गेल्या काही महिन्यांपूर्वी पुण्यात शरद मोहोळ यांची हत्या झाली होती. मात्र त्यानंतर आता आणखी एक मोठी घटना घडली आहे. पुण्यातल्या येरवडा कारागृहात ड्युटीवर असलेल्या शेरखान पठाण नावाच्या अधिकाऱ्याला कुख्यात आंदेकर टोळीतल्या सदस्यांनी बेदम मारहाण केली. अगदी क्षुल्लक कारणावरून ही मारहाण झाल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित टोळीतल्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या गुरुवारी (दि. 11) ही खळबळजनक घटना घडली. येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेले आंदेकर टोळीचे सदस्य विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे या दोघांनी येरवडा कारागृहातल्या शेरखान पठाण नावाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीत पठाण यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली असून त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. आता या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या गुन्हेगारीचा बिमोड कसा करायचा, हा मोठा गंभीर प्रश्न पोलिसांसमोर ‘आ’ वासून उभा आहे.

]]>
https://mahasattabharat.com/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b9%e0%a5%87/feed/ 0 38748
भाजप हा भेकडांचा, भ्रष्ट आणि खंडणीखोर पक्ष: उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका; महाराष्ट्रात पवार, ठाकरे यांचीच नाणी वाजणार! https://mahasattabharat.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%86/ https://mahasattabharat.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%86/#respond Fri, 12 Apr 2024 18:53:18 +0000 https://mahasattabharat.com/?p=38743 पालघरः पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी आपला परिवार आपला परिवार असा उल्लेख करीत असले, तरी त्यांच्या परिवारात फक्त मोदी आणि त्यांची खुर्ची हे दोघेच शिल्लक आहे, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधान होण्यासाठी साहाय्य केले, तिलाच तुम्ही संपवायला निघाला आहात, अशी टीका करताना त्यांनी भाजपला भेकडांचा भ्रष्ट आणि खंडणीखोर पक्ष असल्याचे प्रहार केले.

पालघर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकरे यांनी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चांगलीच पिसे काढली. मी देशाच्या पंतप्रधानावर टीका करत नसून पंतप्रधानांबद्दल मला आदर आहे; परंतु मी मोदी या व्यक्तीवर टीका करीत असल्याचे ठाकरे म्हणाले.

विकासाच्या नावाखाली मित्राचा खिसा भरण्याचे काम
ते म्हणाले, की मोदी हे त्यांच्या मित्रांचा खिसा विकासाच्या नावाखाली भरत आहेत, हे आम्ही कदापि होऊ देणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला. वाढवण बंदरांना स्थानिक लोकांचा विरोध असताना त्यांनी निवडणूक तोंडावर मोठा फौजफाटा आणून जनसुनावणी घेतली. आता रणगाडे आणून ते पुन्हा जनसुनावणी घेतील; परंतु वाढवण बंदर कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राला विध्वसंक उद्योग
महाराष्ट्राच्या वाट्याला विध्वंसक उद्योग द्यायचे आणि चांगले उद्योग गुजरातला न्यायचे ही मोदी यांची नीती असून या नीतीला आमचा ठाम विरोध आहे, असे त्यांनी सांगितले. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. केवळ गुजरातचे नाहीत असे निदर्शनास आणून देऊ ठाकरे म्हणाले, की देशात तीनशेहून अधिक जागा मिळवून ‘इंडिया’ आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. त्या वेळी आम्ही कोणताही प्रांतभेद न करता गुजरात आमचेच आहे, असे समजून गुजरातच्या वाट्याचे गुजरातला देऊ; परंतु महाराष्ट्राच्या वाट्याचे मात्र कुणाला ओरबाडू देणार नाही. मोदी तिथे असले, तरी हे होऊ देणार नाही अशी टीका त्यांनी केली.

भाजपचे तोंड शेणाने माखलेले
ज्या शिवसेनेने भाजपला मोठे केले, तो भाजप आता मूळचा भाजप राहिला आहे का, असा सवाल करून शाह यांच्यासोबत कोण कोण आहेत, हे त्यांनी एकदा तपासून पाहिले पाहिजे. इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारा पक्ष नखशिखांत भ्रष्टाचारात बरबटलेला आहे. दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेण्या अगोदर तुमचे तोंड शेणाने माखले आहे, ते पाहा असा सल्ला त्यांनी दिला.

भ्रष्ट मांडीला मांडी लावून
महाराष्ट्र ठाकरे आणि पवार यांचा आहे. त्यांचेच नाणे महाराष्ट्रात वाजणार आहे, हे मोदी यांना जाणवल्यामुळेच त्यांनी पक्ष फोडले. ज्यांच्यावर खंडणीचे, गैरव्यवहाराचे आरोप केले त्यांनाच आता मांडीशी बसवून घेतले. सत्तर हजार कोटी रुपयांचे सिंचन घोटाळा करणारे आता तुम्हाला कसे चालतात, असा सवाल करून ठाकरे म्हणाले, की मी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून मला सोडून काही मिंधे तिकडे गेले; परंतु शरद पवार यांनी तर त्यांचा विचार अद्यापही सोडलेला नाही. ते अजून हयात आहेत, तरी त्यांना अजित पवारांनी का सोडले याचे उत्तर संबंधितांनी द्यायला हवे. दिल्लीचे फोन आले तर अजूनही हे सतरंज्या उचलण्याचे काम करतात, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली.

देईल साथ, त्याचा करील घात
भाजपची नीती ‘देईल त्यांना साथ करेल, त्यांचा घात’ अशी आहे. ज्यांनी मोठे केले, ज्यांनी अडचणीच्या काळात साथ दिली, त्यांनाच आता ते संपवायला निघाले आहेत, अशी टीका करून ते म्हणाले, की पालघरच्या विकासाच्या नावाखाली मित्रांचे खिसे भरण्याचा उद्योग होत असेल, तर तो कदापि होऊ देणार नाही. वाढवण बंदराऐवजी आम्हाला येथे विमानतळ आणि जव्हारसारख्या ठिकाणी हिल स्टेशन उभारण्यात रस आहे.या वेळी खासदार संजय राऊत, आमदार विनोद निकोले आमदार सुनील भुसारा, लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी, कॉम्रेड अशोक ढवळे काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील वाढवण बंदर संघर्ष समितीचे नारायण पाटील,मिलिंद राऊत कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो आदींची भाषणे झाली. ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी प्रथमच भगव्या झेंड्याबरोबर कम्युनिस्ट पक्षाचे लाल झेंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे झेंडे दिसत होते

]]>
https://mahasattabharat.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%86/feed/ 0 38743
बरंच झालं की, राज ठाकरेंकडून ‘गधड्या’ पत्रकारांना ऐकावे लागले खडे बोल…! आता कराल ना त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध…? https://mahasattabharat.com/%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9a-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%a1/ https://mahasattabharat.com/%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9a-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%a1/#respond Fri, 12 Apr 2024 16:29:30 +0000 https://mahasattabharat.com/?p=38737 हल्लीची पत्रकारिता किती रसातळाला चाललीय, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्याकडून ठराविक आणि अर्धवटराव असलेल्या पत्रकारांना ‘अरे गधड्यांनो’ असं विशेषण ऐकावं लागणं. यात राज ठाकरेंची काडीमात्रही चूक नाही. कारण कुठलीही माहिती न घेता किंवा विषयाचं गांभीर्य समजून न घेता या पत्रकारांनी ‘राज ठाकरे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचं प्रमुखपद भूषवावं’, असे अकलेचे जे तारे तोडले, त्यामुळे खरं तर राज ठाकरेच काय, पण कोणाचंही पित्त खवळल्याशिवाय राहणार नाही. आता पत्रकारांचा अपमान झाला म्हणून राज ठाकरे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा जाहीर निषेध करण्याची कोणत्याही पत्रकार संघटनेची हिंमत होईल, असं आम्हाला तर या क्षणी वाटत नाही.

‘राज ठाकरे दिल्लीला गेले, त्यांना बारा तास वाट पाहावी लागली’, ‘दिल्लीला जाणारे राज ठाकरे पहिलेच’, ‘राज ठाकरेंनी शिंदे शिवसेनेचे प्रमुखपद भूषवावं’, या मिडियाच्या बातम्यांची राज ठाकरे यांनी खरपूसपणे जी दखल घेतली, जाहीर भाषणात पत्रकारांना ज्या कानपिचक्या दिल्या, त्या सगळ्यांचं वास्तविक पाहता कौतुकच करायला हवंय.

पत्रकारितेचे जनक असलेले कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेला समाजसेवेचं व्रत असं म्हटलेलं आहे. मात्र सेवा सोडून भलत्याच मखलाशा करणाऱ्या आणि अशा विचित्र बातम्या देणाऱ्या मिडियातल्या पत्रकारांच्या बुध्दीची जाहीरपणे चिरफाड करण्याची ही अशी धमक एकटे राज ठाकरेच दाखवू शकतात, हेदेखील तितकंच खरं आहे.

आता ‘गधडे’ या शब्दाविषयी थोडसं…!

मातीची भांडी तयार करण्यासाठी लागणारा पोयटा किंवा पोयट्याच्या प्रकारातली माती पाठीवर वाहून नेण्याचं काम जे प्राणी करतात, त्यांना खरं तर गधडे, गर्दभ किंवा गाढव असं म्हटलं जातं. मग काही अर्धवट पत्रकारसुध्दा दुसऱ्यांची ओझी पाठीवर वाहतात. म्हणून हा शब्द अशा पत्रकारांना चपखलपणे लागू होतो.

अरेरे ! काय होतास तू …? काय झालास तू…?

फार पूर्वी म्हणजे 25 ते 30 वर्षांपूर्वी पत्रकार म्हटलं, की सरकारी अधिकारी सुतासारखं सरळ व्हायचे. पोलीस ठाण्यात पत्रकारांची ‘एन्ट्री’ होताच पोलीससुद्धा डोक्यावरची टोपी व्यवस्थित करायचे. सरकारी अधिकारी मोजून मापून बोलायचे. भ्रष्टाचारी अधिकारी पत्रकारांच्या समोरदेखील येत नव्हते. इतका पत्रकारांचा दबदबा होता. परंतु आजमितीला पत्रकारितेची ही अशी दुरवस्था झाल्यानं ‘काय होतास तू ? काय झालास तू’? असंच म्हणावंसं वाटतं.

]]>
https://mahasattabharat.com/%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9a-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%a1/feed/ 0 38737
22 कोटी रुपये घेऊन पळून गेलेल्या शेअर मार्केटच्या ‘त्या’ बिगबुलच्या घर आणि कार्यालयाची संतप्त नागरिकांनी केली नासधूस ; शेवगावच्या घोटण परिसरातला आणखी एक जण फरार…! https://mahasattabharat.com/22-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%8a%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87/ https://mahasattabharat.com/22-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%8a%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87/#respond Fri, 12 Apr 2024 11:18:56 +0000 https://mahasattabharat.com/?p=38730 शेअर मार्केटच्या माध्यमातून जास्तीत जास्त कमिशन देण्याचं आमिष दाखवत लोकांच्या कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत सामान्य लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या शेअर मार्केटच्या बिग बुल्सची ‘उलटी गिनती’ सुरु झाली आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या आणि 22 कोटी रुपये घेऊन पळून गेलेल्या एका बिगबुलच्या घर आणि कार्यालयाची संतप्त नागरिकांनी प्रचंड नासधूस केली. दरम्यान, शेवगाव तालुक्यातल्या घोटण परिसरातला आणखी एक जण पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे.

या घटनेमुळे शेवगावमधल्या शेअर मार्केटच्या एजंट मंडळींना मात्र ‘पळता भुई थोडी’ झाली आहे. घर आणि कार्यालयाची एवढी सारी नासधूस होऊनदेखील शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रारच दाखल नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

संतापजनक बाब अशी आहे, की एका स्थानिक पत्रकाराला या व्यवसायातल्या एका भामट्याकडून अप्रत्यक्षपणे धमकी देण्याचा प्रकार घडल्याचीदेखील चर्चा आहे. ‘शेअर मार्केट ऑनलाईन ट्रेडिंगच्या विरोधात बातमी केली तर तुझा बेत पाहू’, अशी धमकी देण्याचा प्रकार घडला असून त्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार आहे.

शेवगाव पोलीस ठाण्याचा गोपनीय विभाग नक्की करतोय तरी काय?

शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेअर मार्केटच्या नावाखाली मोठा नंगानाच सुरु आहे. या व्यवसायात सामान्य लोकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. हे सारं सुरु असताना शेवगाव पोलीस ठाण्याचा गोपनीय विभाग नक्की काय करतो आहे, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.

]]>
https://mahasattabharat.com/22-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%8a%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87/feed/ 0 April 12, 2024 nonadult 38730
दूध धंदा करणारे आमदार दुधाच्या कमी भावाबद्दल कधी बोललेत का ? आमदार कर्डिलेंचा नामोल्लेख टाळून निलेश लंके यांचा सवाल…! https://mahasattabharat.com/%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%a7-%e0%a4%a7%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%a7/ https://mahasattabharat.com/%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%a7-%e0%a4%a7%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%a7/#respond Fri, 12 Apr 2024 10:15:37 +0000 https://mahasattabharat.com/?p=38725 ज्या लोकांनी दहशत आणि गुंडगिरीच्या जोरावर राजकारण केलं त्यांची दहशत जनतेनंच आता मोडून टाकली आहे. या भागातून जनतेने त्यांना तडीपार केलं आहे. पण तेच आता माझ्यावर गुंडगिरीचा आरोप करत आहेत. दुधाचा धंदा करणारे आमदार कधी दुधाला कमी भाव मिळाला म्हणून आवाज उठवतात का, यावर कधी बोलतात का, असा सवाल इंग्लिश माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता उपस्थित केला.

पाथर्डी शेवगाव आणि राहुरी नंतर नगर तालुक्यात निलेश शेळके यांच्या जनसंवाद यात्रेचा कार्यक्रम पार पडला. नगर तालुक्यातल्या डोंगरगण, मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी, चाफेवाडी, जेऊर, शेंडी, पोखर्डी, बुऱ्हाणनगर, कापूरवाडी, नागरदेवळे, दरेवाडी या भागात निलेश लंके यांचा दौरा पार पडला. यावेळी पहाटे तीन वाजता ते बोलत होते.

या दौऱ्यात महाविकास आघाडीचे गोविंद मोकाटे, रोहिदास कर्डिले, संदीप कर्डिले, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, उद्धवराव दुसुंगे, भाऊसाहेब काळे, राजेंद्र भगत, रामेश्वर निमसे आदींसह नेते यावेळी उपस्थित होते.

लंके पुढे म्हणाले, की विरोधकांनी आरोप करण्यापूर्वी कांद्याचे निर्यात बंदी, शेतमालाला कमी मिळत असलेल्या भाव आणि त्यामुळे शेतकऱ्याला बसत असलेला आर्थिक फटका, दुधाची कमी झालेली बाजार भाव आणि शिक्षण घेऊनदेखील बेरोजगार असलेल्या तरुण पिढीनं यावर बोलले पाहिजे. प्रवरा कारखान्यातल्या 191 कोटी घोटाळ्याच्या संदर्भात तरुणांनी पुढे आलं पाहिजे.

]]>
https://mahasattabharat.com/%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%a7-%e0%a4%a7%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%a7/feed/ 0 38725