Crime News | 1 कोटी 22 लाखांच्या खंडणी प्रकरणी विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाणसह तिघांविरूध्द डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा
पुणे : – Pune Crime News | 2 कोटीच्या खंडणीची मागणी करून 1 कोटी 22 लाख रूपये खंडणी (Extortion Case) स्वरूपात घेतल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) अॅड. प्रविण पंडित चव्हाण (Adv Pravin Pandit Chavan) यांच्यासह तिघांविरूध्द डेक्कन पोलिस ठाण्यात (Deccan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
यासंदर्भात सुरज सुनिल झंवर यांनी फिर्याद दिली आहे. डेक्कन पोलिसांनी भांदवि 166, 213, 384, 385, 386, 388, 120 ब, 606 आणि 34 प्रमाणे अॅड. प्रविण पंडित चव्हाण (रा. सुमंगल अपार्टमेंट, मोदीबाग, शिवाजीनगर), शेखर मधुकर सोनाळकर Shekhar Madhukar Sonalkar (नयनतारा अपार्टमेंट, इश्वर कॉलनी, सुपारी कारखान्याजवळ, जळगाव, एमआयडीसी) आणि उदय नानाभाऊ पवार Uday Nanabhau Pawar (रा. जिजळगाव, चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 20 नोव्हेंबर 2021 ते जुन 2022 दरम्यान विशेष सरकारी वकील अॅड. प्रविण चव्हाण, शेखर सोनाळकर आणि उदय पवार यांनी आपआपसात संगणमत करून सरकारी लोकसेवक असल्याचा पदाचा गैरवापर करून फिर्यादी झंवर व त्यांच्या वडिलांना नुकसान पोहचवण्यासाठी झंवर यांच्या वडिलांस जामिन मिळणेकामी सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
कोथरूड पोलिस ठाण्यात (Kothrud Police Station) दाखल असलेल्या गंभीर गुन्हयात झंवर
यांना अडकवण्याची भिती घातली तसेच मोक्का लावुन आत अकवण्याचा कट करून झंवर यांच्याकडे 2 कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली.
त्यानंतर अॅड. प्रविण चव्हाण आणि इतरांनी त्यांच्याकडून 1 कोटी 22 लाख रूपये खंडणी स्वरूपात घेतले आहेत.
झंवर यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.16) फिर्याद दिल्यानंतर अॅड. प्रविण चव्हाण आणि
इतर दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास डेक्कन पोलिस करीत आहेत.