कोरोनाचा झाला अंत ; पण खबरदार ! तो संपलेला नाही ; जागतिक आरोग्य संघटनेचं स्पष्टीकरण !

spot_img

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीची १५ वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष कीटेड्रोस एडनॉम गेब्रेयसस म्हणाले, ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून कोरोनाचा अंत झाल्याची घोषणा केली जावी, असं मला सांगण्यात आलं. मी त्यांचा सल्ला स्विकारला आहे. म्हणूनच, आता मोठ्या आशेनं, जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून कोरोनाचा अंत झाल्याचं जाहीर करतो. पण याचा अर्थ कोरोना पूर्णपणे संपला, असा होत नाही’.

जागतिक आरोग्य संघटनेनं ३० जानेवारी २०२० रोजी कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटनुसार कोरोनामुळे आतापर्यंत ७० लाख लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या महासाथीनं जगभरात थैमान घातलं होतं.

घड्याळाच्या काट्यावर चालणारं जग अचानक पूर्णपणे थांबलं होतं. कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेनं जागतिक महासाथ घोषित केलं होतं. कोरोनामुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला.

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत घाबरूनच अनेकांचा मृत्यू झाला. याचा गैरफायदा सर्वच नाही. पण अनेक डॉक्टरांनी घेतला. या आजारासाठी महत्त्वाचं असलेल्या रेमडीसिविर इंजेक्शनची किंमत ४० हजारपर्यंत गेली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांना ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

अनेक रुग्णांना दवाखान्यात खाटा मिळाल्या नव्हत्या. सर्वच नाही मात्र काही डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड आर्थिक लूट करण्याच्या तक्रारदेखील त्यावेळी करण्यात आल्या होत्या. यापैकी काहींनी खासगी डॉक्टरविरुद्ध कोर्टात तक्रारी केलेल्या असून अद्यापही त्या न्यायप्रविष्ठ आहेत.

सुदैवानं जागतिक आरोग्य संघटनेनं मोठी घोषणा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना जागतिक महासाथ म्हणून संपल्याची घोषणा केली आहे. कोरोना आता जागतिक आरोग्य आणीबाणीच्या रुपात संपल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :