CMS छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशन या सामाजिक संघटनेच्या दिनदर्शिका 2023 अनावरण सोहळा.
काल दिनांक 15.01.2023 CMS छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशन दिनदर्शिका अनावरण सोहाळा पद्मश्री पोपटराव पवार साहेब व जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे ह्या मान्यवरांच्या उपस्थितीत राळेगणसिद्ध येथे थाटामाटात पार पडला.
पद्मश्री पोपटराव पवार साहेब व जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे ह्यांना CMS च्या केलेल्या समाजकार्याची माहिती दोघांनी सांगितली, CMS संघटनेचे समाजकार्यात योगदान देणाऱ्या CMS ऍडमिन टीमचे कौतुक त्यांनी केले, पुढील समाजकार्यास शुभेच्छा दिल्या.
CMS दिनदर्शिका अनावरण सोहळ्यास CMS ऍडमिन टीम मधील संदीप नवसुपे,मनोज सोनवणे, ओंकार देशमुख,संजय शिंदे,अशोक गाडे ,भरत सूंबे,संतोष बेरड,मयूर सोनवणे,अजय गोते, संपदा नांदवडेकर, रोहिनीताई वाघमारे तसेच CMS सभासद वेळात वेळ काढून उपस्थित होते.
या दिनदर्शिका मध्ये ब्लड बँक,महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना ,मुख्यमंत्री सहाय्यता निधी सारथी बद्दल माहिती आहे यांसारखी उपयुक्त माहिती दिली आहे