ति’ची लावणी अश्लिल म्हणवून. हिणवलं पण ‘ती’च आता येतेय मोठ्ठ्या पडद्यावर !पण सोशल मिडियावर नृत्यांगणा गौतमी पाटीलला बंदी घालण्याची होतेय मागणी.गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला ‘या’ गावात दिली नाही जागा !

spot_img

‘ति’ची लावणी अश्लिल म्हणवून. हिणवलं पण ‘ती’च आता येतेय मोठ्ठ्या पडद्यावर !पण सोशल मिडियावर नृत्यांगणा गौतमी पाटीलला बंदी घालण्याची होतेय मागणी.गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला ‘या’ गावात दिली नाही जागा !

 

ज्या लावणी नृत्यांगणा असलेल्या गौतमी पाटीलची लावणी अश्लिल आहे, असा मध्यंतरी आरडाओरडा झाला त्या गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ या सिनेमाचं शुटिंग सोलापूर (Solapur), माढा (Madha), हंपीसह (Hampi) परदेशातही झालंय. या सिनेमात गौतमी पाटील (Gautami Patil Movie) नक्की कोणती भूमिका साकारणार, हे अद्याप समोर आलेलं नाही. ‘घुंगरु’ या सिनेमात गौतमी बाबा गायकवाडसोबत गौतमी पाटील मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

 

गौतमी आणि बाबा गायकवाड यांच्यासह ‘घुंगरु’ या सिनेमात सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकारदेखील झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा सिनेमाचं कथानक कलावंत आणि लोककलावंतांच्या आयुष्यावर भाष्य करणारं असू शकतं.

 

‘घुंगरु’ या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा बाबा गायकवाड यांनी सांभाळली आहे. एका व्हायरल व्हिडीओमुळे गौतमी पाटील रातोरात प्रसिद्धीझोतात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

 

 

सोशल मिडियावर तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत असला तरी तिचा मोठा चाहतावर्ग आहे. गौतमी पाटील ही सोशल मीडियावर ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा आहे. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं.

 

 

यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवरतिचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. इतकंच काय तर अनेक कार्यक्रमांमध्ये गौतमीला डान्स करण्यासाठी बोलवलं जातं आणि त्यासाठी तिला मानधन दिलं जातं. दरम्यान काही दिवसांपूर्वी व्हिडीओमधील डान्स स्टेप्समुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली. सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्या, ज्यामुळे गौतमीला माफी मागावी लागली होती.

 

नृत्यामुळे तरुणांना भुरळ घालणाऱ्या लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलचा (gautami patil) इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमावरती बंदी घालावी, अशी मागणी जोर धरत असताना हा रद्द झालेला कार्यक्रम आता चर्चेचा विषय ठरत आहे.

 

मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. गौतमी पाटीलच्या लावणीचे अनेक चाहते आहेत. मात्र गौतमीच्या डान्सवर तातडीनं बंदी घालण्यात यावी अशी मागणीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. तिच्या नृत्यातून अश्लिलता दिसते, असा आरोप सातत्याने लावणीप्रेमी आणि लावणी कलाकार करत आहेत.

 

लावणीप्रेमींनी एकत्र येत काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आरोप केले होते. कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, सांगलीतल्या बेडग इथल्या एका मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आणि बेडग गावचे नाव देशात गाजवणार्‍या मानकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

 

नृत्याचा कार्यक्रम सुरु झाला. तिचं नृत्य पाहण्यासाठी जिल्ह्यातून आणि बाहेरुन तिचे चाहते आले होते. कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या पटांगणात तुफान गर्दी झाल्याने काही प्रेक्षक हे शाळेच्या कौलारु छतावर जाऊन नृत्याचा ताल धरु लागल्याने कौलांचा चुराडा झाला. तार जाळीच्या कम्पाऊंडचेही मोठं नुकसान झालं. त्याचबरोबर ज्या झाडावर प्रेक्षक बसले होते ते झाडदेखील मुळासह कोसळलं होतं.

 

गौतमी पाटील ही सोशल मीडियावर ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा आहे. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडीओ तुफान व्हायरल होताहेत.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :