अहमदनगर जिल्ह्यातल्या ‘या’ दोघींची झाली निमंत्रित क्रिकेट सामन्यांसाठी निवड !

spot_img

सोलापूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 19 वर्षांखालील (मुली) निमंत्रित सामन्यांसाठी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे अस्मिता संभाजी पवार व आर्या राजेश जगताप यांची निवड करण्यात आली आहे.

या निवड चाचणीमध्ये नगर जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या निवड चाचणीमध्ये अस्मिता व आर्या या दोघींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून जिल्हा अंडर 19 क्रिकेट संघात निवड निश्चित केली. मागील वर्षी पुणे येथे झालेल्या पंधरा वर्षाखालील अहमदनगर जिल्हा संघामध्ये या दोघींचा सहभाग होता.

या दोघींची निवड झाल्याबद्दल नेवासा तालुक्यातील सर्व क्रीडाप्रेमी, राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. अस्मिता पवार ही निंभारी येथील ॲडव्होकेट संभाजी पवार यांची मुलगी असुन मुळा एज्युकेशनच्या ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. तर आर्या जगताप ही सेंट मेरी स्कूलची विद्यार्थिनी आहे.

या दोघींनीही सुदर्शन क्रिकेट अकॅडमी मधून प्रशिक्षण घेतले आहे .अकॅडमी चे संस्थापक व प्रशिक्षक इमरान खान पठाण सर यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या निवडीबद्दल दोघींचे सर्वत्र कौतूक होत आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :