अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक Police Supritend या पदावर रुजू झाल्यापासून एसपी राकेश ओला SP Rakesh Ola यांनी जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांवर प्रभावी अशी करडी नजर ठेवलीय. एसपी ओला यांच्या या खमक्या धोरणामुळे अवैध धंदेचालकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मात्र असं असलं तरी काही ठिकाणचे अवैध धंदे अद्यापही सुरुच आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यात असलेल्या गुहा परिसरातल्या एका हाॅटेलमध्ये लाल काळा जुगार खुले आम सुरु आहे. या धंद्यात पैसे हरलेल्या अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तर तणावाखाली Firstration आल्यानं आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवलेली आहे. एसपी राकेश ओला यांच्या नजरेतून नगर जिल्ह्यातले अवैध धंदे सुटलेले नाहीत.
अशा परिस्थितीत राहुरीतल्या गुहा परिसरातला हा अवैध धंदा पोलिसांच्या नजरेतून कसा सुटला, या धंद्यावरुन कोण ‘मलिदा’ गोळा करतंय, स्थानिक पोलीस या धंद्याकडे का डोळेझाक करताहेत, या अवैध धंद्यामुळे आणखी किती जणांच्या संसाराची धुळधाण होणार आहे, या अवैध धंद्यातून कोण कोण मालामाल झाले, कोणा कोणाला कर्जबाजारी व्हावं लागलं, या बाबी अद्यापही समोर आलेल्या नाहीत.
राहुरीच्या गुहा परिसरातल्या एका हाॅटेलमध्ये काळा पिवळा जुगार चालवणारा इसम हा शिर्डीचा रहिवाशी असल्याची माहिती हाती आली असून त्याचं नाव जाणून घेण्याचा ‘महासत्ता भारत’चा प्रयत्न आहे. या अवैध धंद्यात काळी आणि पांढर्या रंगाच्या अशा दोन तबकड्या असतात. काही जण पांढर्या रंगाच्या तर काही जण काळ्या रंगाच्या तबकडीवर पैसे लावताहेत.
सुरुवातीला हा इसम या दोन्ही रंगांच्या तबकड्यांवर पैसे लावणार्यांना भरपूर पैसे देतो. विशेष म्हणजे या खेळात नवख्या माणसाबरोबर या अवैध धंदेचालकाचीही काही माणसं सहभागी होतात. मात्र या जुगारात हा इसम अशी काही हातचलाखी करतो, की चार पाच प्रयत्नांअंती हा जुगार खेळणारा इसम कधी कर्जबाजारी होतो, हे त्याचं त्यालाच कळत नाही.
या जुगाराविषयी सामान्य माणसाच्या मनात गोडी निर्माण व्हावी, यासाठी सदर इसम हा जुगार खेळणार्याशी खूप आपुलकीनं वागतो. जिंकलेल्या डावांवर त्याला वाट्टेल तितके पैसे अतिशय प्रामाणिकपणे देतो. मात्र तो इसम या जुगारात एकदा का गुरफटला, तर त्याची जास्तीत जास्त आर्थिक लूट कशी करता येईल, अशा पध्दतीनं हा इसम जुगारात सहभागी होणार्याला अतिशय मतलबी अशी वागणूक Treatment देतो.
हा जुगार फार वर्षांपूर्वी अहमदनगरच्या माळीवाडा भागातल्या जुनी वसंत टाॅकिज परिसरात चालायचा. त्यावेळीदेखील या अवैध धंद्यातून अनेक जण कर्जबाजारी झाले होते. अहमदनगर जिल्ह्यातून हा धंदा काहीसा ‘हद्दपार’ झाला होता. मात्र आता पुन्हा या धंद्याला ‘अच्छे दिन’ आले आहेत.
राहुरी तालुक्यातल्या ज्या गुहा परिसरात काळा पिवळा हा जुगार चालतो, तो भाग नगर – मनमाड महामार्गाला लागून आहे. त्यामुळे ज्या हाॅटेलमध्ये हा जुगार चालतो, त्या हाॅटेलमध्ये सतत वर्दळ असते. या परिसरातून परप्रांतिय वाहनांची सतत वर्दळ असते. यात अनेक अशिक्षित आणि अल्पशिक्षित वाहन चालकांचं प्रमाण जास्त आहे.
या लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत शिर्डीचा हा इसम राहुरीच्या गुहा परिसरातल्या एका हाॅटेलमध्ये काळा पिवळा हा जुगार खेळवित असून दिवसाकाठी या अवैध धंद्यातून तब्बल 1 लाख किंवा त्याहून अधिक कमाई Daily Turn Ovor होत असल्याची या भागात जोरदार चर्चा आहे. कधी तरी जास्त पैसे मिळतील, या आशेपोटी अनेक जण या जुगारावर पैसे लावताहेत.
अशी आहे ‘ग्यानबाची मेख’ ! काळा पिवळा हा जुगार खेळविताना शिर्डीचा हा इसम काही खास ‘ट्रिक’ वापरतो. ज्यावेळी नवखा माणूस हा जुगार खेळतो, तेव्हा त्याला यातलं काहीच कळत नाही. यामध्ये काळ्या आणि पांढर्या रंगांच्या दोन तबकड्या आहेत, त्यात एक तबकडी अशी आहे, जी जोरात दाबल्यावर तिचा रंग बदलतो म्हणजे पांढर्याऐवजी काळा किंवा काळ्याऐवजी पांढरा होतो. जोपर्यंत हा जुगार खेळणारा नवखा असतो, तोपर्यंत हा इसम काहीच करत नाही. मात्र तो नवखा ज्यावेळी तावातावानं हा जुगार खेळायला लागतो, त्यावेळी तो इसम एक तबकडी जोरात दाबतो आणि माणूस या जुगारात वारंवार हरतो. अशा प्रकारची या जुगारातली खरी ‘ग्यानबाची मेख’ आहे.