अजित पवार भाजपच्या सीमारेषेवर ; राणे यांचं वक्तव्य ; ‘त्या’ नेत्यांवर ‘सामना’तून टीका

spot_img

अजित पवार सीमा रेषेवर आहेत, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र, शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घडामोडीमुळे ही चर्चा शांत झाली होती. परंतू नारायण राणे यांनी पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आणणारे वक्त्व्य केले आहे.

दरम्यान, निवृत्तीची घोषणा करताच प्रमुख नेत्यांनी पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. ‘तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी विलापी भाषा केली. यापैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे.

याच कुंपणावरच्या काही नेत्यांनी पवारांच्या राजीनाम्यानंतर सगळ्यात जास्त विलाप केला. पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले… अशी घणाघाती टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

अध्यक्ष पदाची आज निवड !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नेमलेल्या समितीची बैठक आज दि. 5 मे रोजी होणार आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात सकाळी 11 वाजता ही बैठक होईल. शरद पवार राजीनाम्यावर ठाम राहिल्यास सुप्रिया सुळे अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर समितीची घोषणा करण्यात आली होती. समिती याबाबत निर्णय घेणार आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :