मुंबई-पुणेनंतर आता नाशिकमध्येही धावणार मेट्रो ! केंद्रीयमंत्री नितीन गडकरीनी दिली 1600 कोटी रुपये खर्चाला मंजुरी !

spot_img

केंद्रातलं भाजप सरकार रस्ते, राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, हवाई मार्ग आणि रेल्वे मार्गाच्या बांधणीसाठी प्रसिध्द आहे. जेव्हा जेव्हा देशात यापूर्वी भाजपशासित सरकार अस्तित्वात येतं, तेव्हा तेव्हा देशातल्या रस्त्यांची, महामार्गांची कामं झपाट्यानं मार्गी लावली जातात. यापूर्वी भाजप सरकारनं पुणे, मुंबई या शहरात मेट्रोचं जाळं विणलं. आता नाशिकमध्येही मेट्रोच्या कामाचा लवकरच शुभारंभ होणार आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस नाशिक जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. नाशिकच्या इगतपुरीमध्ये त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ होता. यानिमित्तानं केंद्रीयमंत्री गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली. नाशिकमध्ये मेट्रो रेल्वे धावणार आहे. यासाठीच्या 1600 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्रीयमंत्री गडकरींनी यांनी मंजुरी दिलीय.

केंद्रीयमंत्री गडकरी म्हणाले, ‘कुठल्याही जिल्ह्याचा किंवा राज्याचा आणि देशाचा विकास हा पायाभूत सुविधांमुळे Infrastructure  झपाट्यानं होतो. नेमकं ही बाब भाजप नेतृत्वानं हेरली आणि देशातल्या अनेक राज्यांत आणि जिल्ह्यांत पायाभूत सुविधांवर भर दिलाय. त्यामुळेच विविध शहरांमध्ये गरजेनुसार रेल्वे मार्ग, उड्डाणपूलं, भुयारी मार्ग, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांच्या कामांसह मेट्रोचं जाळं तयार करण्यात येत आहे’.

नाशिकच्या या मेट्रोसंदर्भात बोलताना केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सांगितलं, हा मेट्रो प्रकल्प नाशिककरांसाठी वेगवान प्रगतीची अमूल्य अशी भेट देणारा ठरेल. जमिनीवर दुपदरी महामार्ग, त्यावर डबल डेकर महामार्ग आणि त्यावरुन मेट्रो धावणार आहे. नाशिकच्या वेगवान प्रगतीचा आलेख असाच दिवसेंदिवस उंचावत जाणार आहे. नाशिककरांना एकदा का दर्जेदार पायाभूत सुविधा मिळाल्या, की या जिल्ह्याचा औद्योगिक, शेती क्षेत्रासह अनेक क्षेत्रात विकास होणार आहे.

या विकासकामांमुळे नाशिक जिल्ह्यात विविध कंपन्यांची युनिट्स येतील. या कंपन्यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याचा औद्योगिक विकास झपाट्यानं होईल. वाढती लोकसंख्येचा विचार करता दळणवळणाच्या सोयी सुविधा वाढल्या, की शहाराचा विकास जलद गतीनं होतो. नाशिक शहराच्या विकासात मेट्रोचा खूप मोठा हातभार लागणार आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :