ACB Trap | 15 हजार रुपये लाच घेताना अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले!

spot_img

ACB Trap | 15 हजार रुपये लाच घेताना अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले!

Thane ACB Trap | Additional Executive Engineer of Mahavitaran Company in anti-corruption net while taking Rs 15 thousand bribe

ठाणे : – मीटर रिडींग बिल प्रिटींग व बिल वितरणाच्या कामाचे थकीत देयकाला ‘समाधानकारक’ असा शेरा देण्यासाठी 15 हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या (Accepting Bribe) राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (MSEDCL) अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला (Addl Executive Engineer) ठाणे एसीबीच्या (Thane ACB Trap) पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. ठाणे एसीबीच्या पथकाने (Thane ACB Trap) ही कारवाई मंगळवारी (दि.17) सायंकाळी सहाच्या सुमारास केली.

रविंद्र केशवराव जाधव Ravindra Keshavrao Jadhav (वय-47) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. याबाबत एका व्यक्तीने ठाणे एसीबीकडे (Thane ACB Trap) सोमवारी (दि.16) तक्रार केली आहे.

तक्रारदार हे काम करत असलेल्या कंपनीच्या मीटर रिडींग बिल प्रिंटिंग व बिल वितरणाच्या कामाच्या थकीत देयकास ‘समाधानकारक’ असा शेरा मारुन,
ते कार्यकारी अभियंता कार्यालयात मंजूरीसाठी पाठवण्यासाठी रविंद्र जाधव यांनी 20 हजार रुपये लाच मागितली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सोमवारी ठाणे एसीबीकडे तक्रार केली.
ठाणे एसीबीच्या पथकाने मंगळवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता रविंद्र जाधव यांनी 20 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 15 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सापळा रचण्यात आला. सायंकाळी सहाच्या सुमारास तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना रविंद्र जाधव यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar)
यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पथकाने केली.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :