केस गळती, टक्कल पडणं, या समस्येवर दररोज ‘हे’ ज्युस प्राषण करा !

spot_img

केस गळती, टक्कल पडणं, या समस्येवर दररोज ‘हे’ ज्युस प्राषण करा !

कमी वयातही डोक्यावरचे केस गायब झाले तर अनेकांना चार चौघांत जायची लाज वाटते. अर्थात हे स्वाभाविकदेखील आहे. चांगल्या आणि सुंदर व्यक्तिमत्वासाठी डोक्यावर दाट केस असणं, हे आजच्या तथाकथित प्रगतीशिल समाजासाठी चांगलं लक्षण मानलं जातं.

डोक्यावर दाट केस उगवावेत, यासाठी आज काल अनेक जण कृत्रिम केशरोपण करताहेत. अहमदनगर, Ahmdnagar औरंगाबाद, Aurangabad नाशिक, Nashik पुणे Pune या शहरांत केशरोपणासाठी हजारो रुपयांचा खर्च आकारला जातो. विशेष म्हणजे ज्यांंना पूर्णत: टक्कल पडलंय, असे अनेक जण केशरोपण करताहेत.

तिशीतल्या किंवा चाळीशीतल्या तसंच अगदीच पन्नाशी ओलांडलेल्या तरुणांना डोक्यावरचे कमी केस ‘इगो पाँईंट’चा Igo Point इश्यु होतो. पार्टीत जाण्यालाही अशी तरुणाई ना ना करते.

आपल्याकडे केसांच्या वाढीसाठी काही उपाय सांगण्यात आलेले आहेत. यातला पहिला आणि सोपा उपाय म्हणजे दोन्ही हातांची नखं एकमेकांवर घासणं. हा उपाय टीव्ही पाहताना किंवा फावल्या वेळेत तुम्ही करु शकता आणि यासाठी काहीच खर्च येत नाही.

केसांच्या वाढीसाठी आणखी एक स्वस्तातला उपाय म्हणजे आवळा आणि भोपळ्याचा ज्युस करुन तो प्यायचा. हल्ली आवळ्याचा सिझन आहे. त्यामुळे हा उपाय कमी खर्चातला आणि केसांच्या समस्यांवरचा रामबाण असा उपाय आहे.

डोक्यावरचं टक्कल झाकण्यासाठी आज काल जे कृत्रिम उपाय केले जाताहेत, त्या उपायांपेक्षा हे दोन उपाय निर्धोक म्हणजे यात कुठलाही धोका नाही आणि हे उपाय कमी खर्चिक आहेत.

हल्ली केसांची समस्या खूपच जास्त वाढलीय. प्रदूषण, केसांवर वारंवार केले जाणारे केमिकल्सचे प्रयोग आणि आहारातूनही पुरेसं पोषण न मिळणे या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येकालाच केसांबाबत कोणती ना कोणती तक्रार असतेच.

प्रत्येकाचंच रुटिन Rutin एवढं व्यस्त Busy आहे की केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणूनच तुमच्याकडे खूप वेळ नसेल पण केसांचं आरोग्य सुधारायचं असेल तर योगगुरू रामदेव बाबा यांनी सुचविलेले हे उपाय करून बघायला हरकत नाही. यामुळे केसांमध्ये नक्कीच सकारात्मक बदल दिसून येईल.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :