भाजपाकडे श्वानांची टीम! रोज एक उठतो आणि भुंकतो!
ठाकरेंच्या आते बहिण किर्ती फाटक यांची घसरली जीभ!
भारतीय जनता पक्षाच्या लोकांना हल्ली जास्त श्वानांविषयी प्रेम झालंय. भाजपनं श्वानांची टीम स्थापन केलीय. रोज एक जण उठतो आणि भुंकतो, असं वक्तव्य करताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आते बहिण किर्ती फाटक यांची जीभ घसरलीय.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना राजकीय पक्षांच्या नेत्याची जीभ घसरण्याचं प्रमाण वाढलंय. या पार्श्वभूमीवर पाठक यांच्या वक्तव्याची आता भर पडली आहे. पाठक म्हणाल्या, आम्ही त्यांना जो ‘गद्दार’ असा शिक्का मारला, तो आता पक्का झालाय.
छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द बोलणार्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची हिंमत अजून या सरकारनं दाखवली नाही. मात्र श्वानांसारखं भुंकण्यासाठी भाजपकडे टीम आहे. रोज कोणी तरी कुठून ना कुठून भुंकण्याचं काम करत असला तरी हे ‘स्क्रिप्टेड’ आहे.
राज्याच्या राजकारणात हल्ली हे जे काही चाललंय, ते खूपच गंभीर आहे. यामध्ये जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचं काम सुरु आहे. विशेष म्हणजे यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघांचाही बरोबरीचा सहभाग आहे, हे या राज्यातल्या जनतेचं मोठं दुर्दैव आहे. सत्ताधारी कसे चुकताहेत, हे सांगण्याची कुठलीही संधी विरोधक सोडायला तयार नाहीत.
सत्ताधार्यांना निष्क्रिय आणि बेजबाबदार दाखवायचं काम विरोधक करताहेत. मात्र सत्ताधारीही पक्के आहेत. विरोधकांच्या या प्रयत्नांची जराशीही पर्वा न करता सत्ताधारी कामे करताहेत. राज्यात रस्त्यांची कामं सुरु आहेत. शेतकर्यांना दुप्पट नुकसान भरपाई देण्याची सरकारनं घोषणा केलीय.
सत्ताधारी आणि विरोधकांची साठमारी आणखी किती दिवस ? महाराष्ट्राच्या राजकारणाची देशात एक वेगळी ओळख आहे. या राज्याच्या सत्ताधार्यांना मग ते कोणत्या पक्षाचे का असेना, त्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. जेव्हा हेच विरोधक राज्याच्या सत्तेवर येतात, तेव्हा आताचे सत्ताधारी त्यावेळी विरोधक बनून सत्ताधार्यांना कोंडीत पकडण्याची वाट पाहतात.
महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक असा हा डाव आणि लपंडाव गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांच्या या साठमारीत राज्याला स्थिर सरकार मिळायला हवं. जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात, अशी सामान्य जनतेची इच्छा आहे. म्हणूनच सत्ताधारी आणि विरोधकांची ही साठमारी आणखी किती दिवस, असा प्रश्न सामान्य जमतेतून उपस्थित होतो आहे.