अरे बापरे ! कॅन्सरचे अनेक प्रकार ? पण तुम्ही घाबरुन जाऊ नका ! ‘या’ नऊ वस्तू कॅन्सरला थोपवू शकतात!

spot_img

तोंडाचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, हाडांचा कॅन्सर, जीभेचा कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, मूत्रपिंडाचा कॅन्सर अशा किती तरी प्रकारांतला कॅन्सर मानवी आरोग्याला हानिकारक ठरतो. कॅन्सर शंभर टक्के बरा होतो, असा दावा आजपर्यंत कोणीही करु शकलेलं नाही.

मात्र या दुर्धर आजाराला थोपविण्याची क्षमता ज्या नऊ वस्तूंमध्ये आहे, त्या नऊ वस्तूंची आपण आता या लेखातून ओळख करुन घेणार आहोत.

मित्रांनो, या वस्तू शोधायला तुम्हाला एखादा डोंगर चढावा लागणार नाही. किंवा फार मोठी धावपळ करावी लागणार नाही. रोजच्या जीवनात या वस्तू सहजा सहजी उपलब्ध होऊ शकतात.

१) कांदा आणि लसून : कांदा आणि लसूनमधे असलेले सल्फर संयुगे मोठे आतडे, स्तन, फुफ्फुस आणि प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींना मारते. लसूनमुळे उच्च रक्तदाबही नियंत्रणात राखला जातो. यामुळे शरिरात इंसुलिनचे उत्पादन कमी होऊन शरिरात ट्युमर होऊ देत नाही.

२) भाज्या : फ्लावर आणि ब्रोकोली हे दोन कॅन्सरविरोधी शक्तीशाली अणू आहेत. या दोन भाज्या डिटोक्सिफिकेशनव्दारे सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य वाढवते, ज्यामुळे शरिरात निर्माण होणाऱ्या कॅन्सरच्या पेशी मारते आणि ट्युमरला वाढण्यापासून कमी करते तसेच फुफ्फुसं, प्रोस्टेट, मूत्रपिंड आणि पोटाचा कॅन्सर कमी करण्यासही मदत करतात.

३) आलं : ताज्या आल्यामध्ये कॅन्सरच्या पेशींशी लढण्याचे खास गुण आहेत आणि याच्या मदतीने ट्युमरच्या पेशीही रोखण्यास मदत होते. आल्याचा अर्कामुळे केमोथेरेपी किंवा रेडियोथेरेपीपासून होणारा त्रास कमी केला जातो.

४) हळद : हे सगळ्यात शक्तीशाली असे नैसर्गिक कॅन्सरविरोधक आहे. हळद हे कॅन्सर पेशींना मारते तसेच ट्युमरलाही वाढण्यापासून रोखते आणि त्याचबरोबर केमोथेरपीचा प्रभाव वाढवते. हळदीमध्ये काळीमिरी आणि तेल एकत्र करूनही अधिक परिणामकारक होते.

५) पपई, किवी आणि संत्र : या फळांमधे भरपूर विटामिन असते. ज्याव्दारे लिव्हरमधे असणारे कार्सिनोजन या फळांच्या सेवनाने आपोआपच कमी व्हायला मदत करते. किवीच्या सालामध्ये फ्लेवनोइड्स आणि नोबिलेटिन नावाचे तत्व असते, ज्याव्दारे कॅन्सरच्या पेशी रोखण्याची क्षमता असते.

६) गाजर, आंबा आणि रताळ : अल्फा आणि बिटा नावाचे कॅरेटिन्स कॅन्सरला नाहीसे करणारे शक्तीशाली घटक आहेत. हे तीन फळं गर्भाशय, मूत्रपिंड, पोट आणि स्तन इ. सारखे विविध प्रकारचे कॅन्सर रोखण्यास उपयोगी आहेत.

७) द्राक्षे : याव्दारे एंथोसायनिन आणि पुलीफेनल्स यांच्या मदतीने शरिरातील उत्पादित होणारे कॅन्सरचे कण कमी करण्यास महत्वाची भूमिका बजावत आहे.

८) टोमॅटो आणि टरबूज : हे लाइकोपीनचे मुख्य स्त्रोत आहे, ज्याला एक शक्तीशाली एंटीऑक्सिडेंट मानले जाते. हे सेलुलरचे म्हणजे पेशींचं नुकसान होण्यापासून थांबवते. आठवड्यातून एकदा टोमॅटोचा एक दशांश भाग आहारात घेतल्याने प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण 18 टक्क्यांनी कमी होते.

९) डाळी आणि सोयाबीन : डाळी आणि सोयाबीन हे प्रोटीन वाढविण्याचं एक प्रमुख स्त्रोत आहे. तसेच फायबरही याव्दारे मिळते, ज्याव्दारे पैनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. सोयाबीनमध्ये वेगळ्याप्रकारचा स्टार्च असतो ज्याव्दारे मोठ्या आतड्यांमधील पेशींचे स्वास्थ सुधारण्यास मदत होते.

तर मग करणार ना या नऊ वस्तूंचा तुमच्या आहारात योग्य वापर? या सर्व वस्तू बाजारात सहजा सहजी मिळतात. मात्र यामध्ये भाजीपाला घेतांना तो ताजा आहे का, हे मात्र पहायला विसरु नका. चला तर मग ! तुम्हा सर्वांना कॅन्सरमुक्त आरोग्याच्या खूप खूप शुभेच्छा !

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :