50 हजार रुपयांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा अधिकारी अडकला एलसीबीच्या ‘ट्रॅप’मध्ये…!
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने एका तक्रारदाराची जमीन रस्ता विस्तारीकरणांमध्ये ताब्यात घेतली होती. या प्रकरणी तक्रारदाराने न्यायालयात याचिका दाखल केली त्या याचिकेवर न्यायालयाने निकाल देत सदर जमिनीचा मोबदला देण्याचे आदेश महापालिकेला दिले. महापालिकेच्या भूसंपादन अधिकाऱ्याच्या टेबलावर ही फाईल आली.
महापालिकेच्या भूसंपादन विभागातल्या रचना सहाय्यक विनोद मोतीराम पंडित या अधिकाऱ्यांना ही फाईल क्लिअर करून मोबदला देण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान तक्रारदाराने या संदर्भात अँटी करप्शन ब्युरो कडे तक्रार केली आणि दोन लाख रुपये 50 हजार रुपये देण्याचे मान्य केलं.
या अधिकाऱ्याला पन्नास हजार रुपयांची लाच घेताना अँटीकरप्शन ब्युरोच्या पथकाने पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. छत्रपती संभाजीनगर परीक्षेचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपाधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, अशोक नागरगोजे, पोलीस हवालदार रवींद्र काळे, पोलीस हवालदार विलास चव्हाण, पोलीस हवालदार कपिल गाडेकर, पुढे समजदार चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.