एकाविरुध्द पोलीस ठाण्यात भादंवि 420 नुसार गुन्हा दाखल होता. मात्र त्याची मालमत्ता सील करु नये, जामीन रद्द करु नये आणि या गुन्ह्यात त्याच्या पत्नीचं नाव टाकण्यात येऊ नये, यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकानं 5 लाख रुपयांची लाच मागितली. मात्र तडजोडीअंती साक्षीदारांमार्फत 2 लाखांची स्विकारताना सदर पोलीस अधिकार्याला नागपूर अँटी करप्शन ब्युरोच्या पथकानं Anti Currption Beauro Nagpur आज (दि. 14) रंगेहाथ पकडलं.
विवेक जानराव लोणकर (वय 57 वर्षे, पोलीस उपनिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय, वर्धा, रा. देवरनकार लेआउट वर्धा) असं त्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे.
यातल्या तक्रारदाराविरुध्द हिंगनघाट पोलीस ठाण्यात भादंवि 420 नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पीएसआय लोणकरकडे आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराला न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर झालेला आहे.
तक्रारदार पीएसआय लोणकर यांच्याकडे हजेरी करीता येत होते. मात्र आरोपी लोकसेवक असलेल्या पीएसआय यांनी तक्रारदाराची जामीन रद्द न करण्यासाठी तसेच त्यांची प्रॉपर्टी सील न करण्यासाठी आणि त्यांचे पत्नीचे नाव या गुन्ह्यात न टाकण्यासाठी लाच रक्कम 5 रुपयांची लाच मागितली.
नंतर मात्र तडजोडीअंती 2 रुपयांची लाच स्विकारली. आरोपी लोकसेवक यांनी पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लाच रकमेची मागणी करून स्विकारली.
राहुल माकणीकर (पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर), मधुकर गिते, (अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर), श्रीमती अनामिका मिर्झापूरे, पोलीस उप अधीक्षक, ला प्र वि. नागपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रविण लाकडे, पोलीस निरीक्षक, श्रीमती. प्रिति शेंडे, पोलिस निरीक्षक, नापोशि सारंग बालपांडे, मनापोशी गिता चौधरी, आशू श्रीरामे, अस्मिता मेश्राम, नापोशी अमोल भक्ते (सर्व ला. प्र. वि. नागपूर) यांच्या पथकानं ही कामगिरी केली.