… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…!
दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!
महासत्ता भारत / पुणे
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीमुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात विविध समित्यांकडून रुग्णालयाची चौकशी सुरु आहे. यामुळे मंगेशकर रुग्णालय प्रशासन अडचणीत आलं आहे. या घटनेनंतर राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रुग्णालयावर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्याचे अभ्यासू आमदार अमित गोरखे यांनी केलेल्या तगड्या पाठपुराव्याला अखेर घवघवीत यश आलं आहे.
यासंदर्भात विविध चौकशी समित्या नेमण्यात आल्या असून, राज्य सरकारला काही अहवाल प्राप्त झाले आहेत. ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने तीन अहवालांची तपासणी केली आहे आणि त्यांचे निष्कर्ष सादर केले आहेत. या अहवालांवर आधारित, दोषींवर कारवाई करण्याची शक्यता आहे. ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने तीन अहवालांची तपासणी केली असून निष्कर्ष सादर केले आहेत.
दरम्यान, तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावर राज्य सरकारने कारवाई करावी, यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ रुग्णालयाबाहेर आंदोलन केले होते.
जनतेचा रोष लक्षात घेता तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. चौकशी समित्या आणि अहवालांवर आधारित, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डॉ घैसासांविरुद्ध गुन्हा आणि रुग्णालयाला दंड……. ताबडतोब निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी समित्या गठीत करून मृत मातेला व कुटुंबाला न्याय देण्याचे काम केले,एक एक समिती चे अहवाल येत आहेत, दूध का दूध पानी का पानी होत आहे. यातून कुणीही सुटणार नाही, बाळांची काळजी घेण्या साठी आम्ही समर्थ आहोत,परंतु दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने मृत मातेविषयी आत्मीयता दाखवून त्या दोन मुलींचे आजन्म पालकत्व स्वीकारुन औदार्य दाखवावे – आमदार अमित गोरखे