महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर विधानसभा लढणार
नाशिक येथे सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत अहिल्या नगर जिल्हा पक्ष निरीक्षक श्री सतीश नारकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी बैठक झाली. या बैठकीत अहिल्या नगर जिल्ह्यातील १२विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे करणार असल्याचे स्वतः सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांनी सांगितले.
आहिल्यानगर मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री सचिन डफळ यांच्या शिफारशीनुसार पारनेर विधानसभा मतदारसंघात मनसे तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब माळी, माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांची शिफारस केली.
यावेळी सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के तसेच जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले तसेच तालुका उपाध्यक्ष सतीश म्हस्के यांनी माळी किंवा पवार दोन्हीं पैकी कोणीही उमेदवारी केली तरी पुर्ण ताकदीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जिवाचं रान करून प्रयत्न करणार व सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पारनेर विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकवणार असल्याचे सांगितले.