काँग्रेस खेळ करत आहे आणि विमुक्तेश्वरानंद हे खेळणी आहेत. प्रियंका गांधी – वाड्रा आणि राहुल गांधी हे जेव्हा हिंदूंच्या विरोधी वक्तव्य करतात, तेव्हा अविमुक्तेश्वरानंद त्यांच्या पाठीशी उभे राहतात. 13 सप्टेंबर 2022 रोजी प्रियंका गांधी – वाड्रा यांनी पूज्य शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद असे संबोधित त्यांना पत्र दिले होते. त्यामुळे शंकराचार्य कोण हे आता काँग्रेस ठरवणार का, असा सवाल स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले, अविमुक्तेश्वरानंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे आहेत. त्यांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी – वाड्रा हे पाठिंबा देत आहेत. त्यांना पत्र लिहिल्याबद्दल प्रियंका गांधी – वाड्रा यांनी माफी मागावी. अन्यथा आम्ही त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करणार आहोत.