लेटेस्ट न्यूज़अजित पवार यांची डोकेदुखी वाढली ; सात कारखान्यांनी घेतली कोर्टात धाव...!

अजित पवार यांची डोकेदुखी वाढली ; सात कारखान्यांनी घेतली कोर्टात धाव…!

spot_img

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनशीट देण्यात आली असली तरी पवार यांची डोकेदुखी वाढली असून राज्यातल्या सात कारखान्यांनी याप्रकरणी कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे पवार यांच्यासमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे.

या याचिकेवर दि. 25 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. राज्यातल्या सात कारखान्यांनी याप्रकरणी न्यायालयात निषेध याचिका दाखल केली आहे. यामध्ये जरंडेश्वर, कन्नड, प्रियदर्शनी, पद्मश्री विखे पाटील, जय अंबिका, जालना, पारनेर या कारखान्यांचा समावेश आहे.

या याचिकांवर गेल्या शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. कदम यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली. या कथित घोटाळ्यातले पिडित न्यायालयात याचिका दाखल करु शकतात का, असा प्रश्न न्यायाधीश कदम यांनी त्यावेळी याचिकाकर्त्यांना विचारला होता.

सहकारी साखर कारखाने, सुतगिरण्या आणि राज्यातल्या इतर सहकारी संस्थांना हजारो कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. त्यामध्ये घोटाळा झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर सहकार आयुक्तांनी शिखर बँकेची चौकशी करण्याकरिता माजी न्यायाधीशांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती देखील केली होती.

दरम्यान, मुंबई आर्थिक शाखेने या प्रकरणी नव्याने तपास केल्यानंतर या प्रकरणात कोणतीही अनियमतता नसल्याचे सांगण्यात आले. ज्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, यांच्यासह आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे यांना क्लीन चीट देण्यात आली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माळशिरस नगरपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..!

माळशिरस नगरपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..! माळशिरस: - माळशिरस नगरपंचायतीचे कर निर्धारण अधिकारी विकास गोरख पवार...

IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल नवटाकेंविरोधात फसवणूक...

दौलत (नाना ) शितोळे ना राज्यमंत्री दर्जा तर भाऊसाहेब शिंदे ना विधान परिषद मिळणारं

दौलत (नाना ) शितोळे ना राज्यमंत्री दर्जा तर भाऊसाहेब शिंदे ना विधान परिषद मिळणारं मुंबई...

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी पोलीस पथक नेमावं: वडारवाडी ग्रामपंचायतीची मागणी…!

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी पोलीस पथक नेमावं: वडारवाडी ग्रामपंचायतीची मागणी...! अहिल्यानगरजवळ असलेल्या भिंगारलगतच्या वडारवाडी ग्रामपंचायत...