लेटेस्ट न्यूज़माळीवाडा बसस्थानक वाहन पार्किंगमध्ये प्रचंड आर्थिक लूट ; 'डी.सी' मॅडम! 'व्हिजिट'...

माळीवाडा बसस्थानक वाहन पार्किंगमध्ये प्रचंड आर्थिक लूट ; ‘डी.सी’ मॅडम! ‘व्हिजिट’ कधी करताय?

spot_img

‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ अशी ‘टॅग लाईन’ असलेल्या एसटी महामंडळाला राज्याच्या कारभाऱ्यांमुळे नक्कीच ‘अच्छे दिन’ आले आहेत. मात्र या महामंडळात आर्थिक हित डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लुटलं जात आहे. अहिल्यानगर (अहमदनगर) शहरातल्या माळीवाडा बसस्थानकाच्या परिसरात असलेल्या वाहन पार्किंगमध्ये दुचाकी वाहनं लावण्याच्या कामात प्रचंड आर्थिक लूट सुरु आहे. एसटी महामंडळाच्या नगर जिल्हा नियंत्रकपदी नियुक्तीस असलेल्या ‘मॅडम’ या बसस्थानकाला आणि वाहन पार्किंगला कधी भेट देणार, असा प्रश्न इथं बक्कळ पैसे खर्च करुन दुचाकी वाहनं लावणाऱ्या नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

माळीवाडा बसस्थानकाच्या या वाहन पार्किंगमध्ये एखाद्यानं समजा सकाळी त्याची दुजाकी लावली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो घेण्यासाठी गेला तर तर त्याच्याकडून 13 तासांसाठीचे तब्बल 120 रुपये घेतले जाताहेत. म्हणजे या ठिकाणी दुचाकी वाहन पार्किंग करण्यासाठी एका दिवसाला जर 40 रुपये दर असेल तर संबंधित ठेकेदार 13 तासांसाठी तीन दिवसांचे 120 रुपये घेत आहे.

माळीवाडा बसस्थानकाच्या परिसरात असलेल्या वाहन पार्किंगमध्ये दुचाकी वाहनं लावण्यासाठी हा ठेकेदार संबंधितांकडून दोन ते तीन दिवसांचे ‘चार्जेस’ ‘ॲडव्हान्स’मध्ये घेत असल्याच्या तक्रार आहेत. नगरच्या एसटी महामंडळात यापूर्वी जे विभाग नियंत्रक (डी.सी.) होते, ते वेळच्या वेळी परिसरातल्या बसस्थानकांची ‘व्हिजिट’ करत असत. मात्र सध्याच्या ‘डीसी’ ‘मॅडम’ यांची अनेक दिवसांपासून अशी ‘व्हिजिट’ झालेलीच नाही, असं बोललं जात आहे.

‘डीसी’ ‘मॅडम’ करतील का या ‘गडबडी’ची चौकशी…?

माळीवाडा बसस्थानक परिसरातलं वाहन पार्किंग ज्या इसमानं ठेकेदारी तत्वावर चालवायला घेतलं आहे, तो इसम नेवासे तालुक्यातल्या सोनईचा रहिवाशी आणि माजी सैनिक आहे. एसटी महामंडळात नोकरीला असलेला एक कर्मचारी माळीवाडा बसस्थानक परिसरातल्या वाहन पार्किंगमध्ये नेहमी ठाण मांडून बसून असतो.  एसटी कर्मचाऱ्याच्या या ‘गडबडी’ची डी.सी. मॅडम चौकशी करणार आहेत का?

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...