राजकारणशरद पवार हे धर्मनिरपेक्षवादी नाहीत, ते तर संधी साधू : प्रकाश आंबेडकर...

शरद पवार हे धर्मनिरपेक्षवादी नाहीत, ते तर संधी साधू : प्रकाश आंबेडकर यांचं खळबळजनक वक्तव्य…!

spot_img

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा उद्यापासून (दि. २०) सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची वक्तव्यं जनतेचं ‘एंटरटेनमेंट’ करत आहेत. मात्र या अनेक नेत्यांपेक्षा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे वेगळ्या विचारांचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्याविषयी प्रकाश आंबेडकर यांनी नुकत्याच काही तासांपूर्वी केलेलं एक खळबळजनक वक्तव्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, ‘शरद पवारांना मी धर्मनिरपेक्ष मानत नाही. धर्मनिरपेक्ष असल्याचे खोटं सांगत आहेत. ते धर्मनिरपेक्ष नाहीत. तर ते संधी साधू आहेत’, असा दावा करत दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे धर्मवादी असल्याचं उघड आहे, असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपकडे जातील, असा दावा करत असताना आंबेडकर यांनी म्हटलंय, ‘ठाकरे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. याशिवाय ठाकरे यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन करून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नाही. ठाकरे यांच्याप्रमाणेच शरद पवार हेदेखील भाजपमध्ये जातील, असंही वक्तव्य आंबेडकर यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील, या मुद्द्यावर बोलताना आंबेडकर म्हणताहेत, की 2014 आणि 2019 मध्ये भाजप 70 ते 72 टक्क्यांवर निवडणूक घेऊन गेले होते. ते आता 50 ते 60 टक्क्यांवर आले आहेत. कमी मतदानाचा फटका भाजपला बसणार आहे. त्यामुळे भाजप यावेळी ‘अब की बार 404 पार’ नाही तर अवघ्या 250 जागा भाजपला मिळतील’.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...