उद्या अर्थात 13 मे 2024 रोजी लोकसभेच्या अंतिम टप्प्यातलं मतदान होणार आहे. हा एक प्रकारे लोकशाहीचा सोहळाच आहे. दिवाळी, गुढीपाडवा नाताळ, रमजान ईद असे सण उत्सव जसे आपण आपल्या आयुष्यात साजरे करतो, तसाच हा एक लोकशाहीचा सोहळा आहे. या सोहळ्यात सर्वांनी अंत:करणापासून सहभागी व्हावं, असं आवाहन ‘महासत्ता भारत’ न्युज नेटवर्कच्यावतीनं आम्ही करत आहोत.
उद्याचा हा सोहळा आपल्या देशाचं भवितव्य निश्चित करणारा सोहळा आहे. या सोहळ्यानंतर आपल्या देशाला पंतप्रधान आणि त्यांचं केंद्रीय मंत्रीमंडळ तसंच 288 खासदार मिळणार आहेत. गेली 45 दिवस विविध राजकीय पक्षांनी त्यांच्या भूमिका मतदारांसमोर मांडल्या. आता मतदार म्हणून तुमचं आमचं एकच कर्तव्य आहे, की नीर क्षीर विवेक बुद्धीनं तुम्हाला आम्हाला उद्या खासदार निवडायचा आहे. त्यामुळे गंभीरपणे विचार करुनच बटन दाबा.
मतदान करण्याचं आवाहन करत असताना तुम्हाला आम्ही हेदेखील सांगू इच्छितो की, भविष्यात तुमच्या समस्यांना किंवा तक्रारींना प्रतिसाद न देणाऱ्या आणि मनमानी करणाऱ्या खासदाराविरुद्ध तुम्ही राष्ट्रपती महोदयांकडे बिनधास्तपणे तक्रार करा.