लेटेस्ट न्यूज़अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि अत्याचारप्रकरणी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ; संगमनेर न्यायालयाचा...

अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि अत्याचारप्रकरणी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…!

spot_img

रस्त्यानं जात असलेल्या १५ वर्षीय मुलीला शाळेत सोडतो, असं सांगून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संगमनेर तालुक्यातल्या नांदूर खंदरमाळच्या गोंधेवाडी इथं राहणाऱ्या रविंद्र वसंत गोंधे या २७ वर्षीय तरुणाला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. संगमनेरचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

संगमनेर तालुक्यातल्या घारगाव परिसरातल्या पठार भागात राहणाऱ्या नागरिकांचं या खटल्याच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. दि. १२ डिसेंबर २०१८ रोजी अल्पवयीन मुलगी रस्त्यानं जात असताना आरोपी गोंधे यानं तिला पळवून नेत वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले.

विशेष म्हणजे ती अल्पवयीन असल्याचं माहित असूनही आरोपी गोंधे यानं तिला लग्नाचं आमिष दाखवलं. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्या अल्पवयीन मुलीला देण्यात आली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...