गुन्हेगारीएसपी साहेब, 'कोतवाली'तल्या 'त्या' गुन्ह्याच्या तपासात तुम्हीच लक्ष घाला ; कोरोनात 'मालामाल'...

एसपी साहेब, ‘कोतवाली’तल्या ‘त्या’ गुन्ह्याच्या तपासात तुम्हीच लक्ष घाला ; कोरोनात ‘मालामाल’ झालेल्या ‘त्या’ डॉक्टरला त्याची लायकी दाखवाच…!

spot_img

सेवाभावी संस्थांचे विश्वस्त असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करुन बनावट कागदपत्रांद्वारे तब्बल आठ कोटी 50 लाख रुपये कर्ज मंजूर करून फसवणूक करणाऱ्या पांढरपेशा व्यवसायातल्या ‘त्या’ दोन डॉक्टरांनी स्वतःवरचा विश्वास गमावला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे.

वास्तविक पाहता हा खूप गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. त्यामुळे तमाम नगरकरांच्यावतीनं आम्हाला एवढंच सांगायचं आहे, की
एसपी साहेब, ‘कोतवाली’तल्या ‘त्या’ गुन्ह्याच्या तपासात तुम्हीच लक्ष घाला. कोरोनाच्या कालखंडात ‘मालामाल’ झालेल्या ‘त्या’ डॉक्टरला त्याची लायकी दाखवाच.

छत्रपती संभाजीनगर महामार्गालगतच्या एका शैक्षणिक संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी एचडीएफसी बँकेच्या स्टेशनरोड शाखेतून आठ कोटी पन्नास लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आलं. या कर्जासाठी ज्या सेवाभावी संस्थांच्या विश्वस्तांचा विरोध असतानादेखील या दोन डॉक्टरांनी त्या संस्थांचे विश्वस्त असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या केल्या आणि या कर्ज प्रकरणात बनावट कागदपत्रं सादर केली.

या गुन्ह्यातल्या एका डॉक्टरचा छत्रपती संभाजी महामार्गालगत बहुमजली दवाखाना आहे. विशेष म्हणजे हा डॉक्टर फक्त बी. ए. एम. एस. शिकलेला आहे. महिलेच्या खूनप्रकरणी तुरुंगात असलेला पत्रकार या डॉक्टरचा पार्टनर आहे. कोरोनाच्या काळात या डॉक्टरनं अक्षरशः खोऱ्यानं पैसा ओढलाय.

नगर शहरात सर्वात प्रशस्त असा आयसीयू कक्ष याच डॉक्टरच्या दवाखान्यात आहे. कोरोनाचे जास्तीत जास्त रुग्ण या दवाखान्यात ॲडमिट करण्यात आले होते. या डॉक्टरनं लष्करी विभागाच्या बनावट परवानग्या आणून दवाखान्याचं बांधकाम केल्याचा आरोप होत आहे. अशा या डॉक्टरला त्याची लायकी दाखवण्यासाठी या गुन्ह्याच्या तपासात नगर जिल्ह्याचे एस.पी. राकेश ओला यांनी स्वतः लक्ष घालावं, अशी अपेक्षा नगरकरांमधून व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...