राजकारणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी नगरमध्ये सभा ; योगी आदित्यनाथ यांच्या सभेनं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी नगरमध्ये सभा ; योगी आदित्यनाथ यांच्या सभेनं होणार प्रचाराची सांगता…!

spot_img

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या मंगळवारी (दि. ७) दुपारी साडेचार वाजता नगर शहरातल्या सावेडी परिसरात असलेल्या संत निरंकारी भवन पटांगणावर सभा होणार आहे. या सभेत पंतप्रधान मोदी कुठल्या मुद्द्यावर बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शेवगाव तालुक्यातल्या बोधेगाव इथं दि. ८ रोजी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची सभा होणार आहे. दि. ९ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जामखेड तालुक्यात सभा होणार आहे. त्याच दिवशी कर्जत तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे. त्याच दिवशी पाथर्डी तालुक्यात आमदार नितेश राणे यांची रॅली काढण्यात येणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची श्रीगोंदा तालुक्यात दि. १० मे रोजी सभा होणार आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांची पाथर्डी तालुक्यात सभा होणार आहे.

लोकसभा निवडणूक प्रचाराची सांगता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेनं होणार आहे. यानिमित्त नगर शहरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रॅली काढण्यात येणार आहे. या सांगता सभेत ‘बुलडोझर बाबा’ अशी ओळख असलेले योगी आदित्यनाथ काय बोलणार, याकडे नगरकरांचं लक्ष लागलं आहे.

‘ते’ मतदार भाजपकडे कसे होतील आकर्षित?

नगर शहरातल्या झेंडीगेट, मुकुंदनगर, भिंगार या परिसरातला मुस्लिम मतदार हा लोकसभा निवडणुकीत निर्णायक मतदाराची भूमिका निभावतो. हा मतदार भाजपकडे जास्तीत जास्त कसा आकर्षित होईल, यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व नेमका कोणता डाव टाकणार, याविषयीदेखील नगर दक्षिण मतदार संघात मोठी उत्सुकता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...