महिंद्रा अँड महिंद्रा या सुप्रसिद्ध कंपनीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही ही भलतीच आकर्षक असलेली कार ग्लोबल मार्केटमध्ये नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने या कारच्या तिसऱ्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये बरेचसे बदल केले आहेत. या कारचं डिझाईन, लूक, फीचर्स आणि मायलेज हे सगळंच आकर्षक आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं या कारला स्पोर्टी लूक दिला आहे. नवीन डिझाईन केलेले ड्रॉप-डाउन एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, त्रिकोणी इन्सर्टसह नवीन ग्रिल सेक्शन आणि नवीन हेडलॅम्प दिले आहेत. एसयूव्हीचा मागचा भागही पूर्णपणे नवीन पद्धतीने डिझाईन करण्यात आला आहे. यात सी-आकाराचे एलईडी टेल लॅम्प आहेत. सध्या अशा प्रकारचे टेल लॅम्प ट्रेंडिंग आहेत. ह्युंदाई आणि किया मॉडेल्समध्येही असेच टेल लॅम्प्स मिळतात.
कंपनीने कारच्या केबिनला प्रीमियम टच दिला आहे. नवीन डिझाईन केलेले डॅशबोर्ड, एक मोठी 10.25 इंची इन्फोटेक सिस्टिम आणि साऊंड साऊंड स्पीकर्स या कारमध्ये कंपनीने दिलेले आहेत. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरुनच या कारच्या केबिनचं तापमान नियंत्रित करू शकणार आहात. या कारच्या अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या शोरूमला नक्की भेट द्या.