काँग्रेसचे मोठी नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आली. आता पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे, की साताऱ्याचे मोठे नेते अर्थात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये जातील आणि राज्यपाल होतील.
आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. हाय कमांडचा त्यांच्यावर विश्वास आहे. अशा परिस्थितीत ‘वंचित’चे प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.