नगर तालुक्यातल्या देऊळगाव सिद्धी इथं खासदार डॉक्टर सुजय विखे यांची सभा होती. सभेला ग्रामस्थ आणि स्थानिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर उपस्थित मतदारांना काही बोलायचंय का, अशी विचारणा झाली आणि मिठू जाधव या स्थानिक ग्रामस्थानं माईक हातात घेत खासदार डॉ. सुजय विखे यांना चांगलेच खडे बोल सुनावले.
जाधव म्हणाले, ‘कोरोना काळात माझी आई आजारी पडली तेव्हा तुम्हाला संपर्क केला होता. मात्र तुम्ही फोन उचलला नाही. तुमच्या कार्यकर्त्यांनी योग्य तो प्रतिसाद दिला नाही. तुम्ही फोन न घेतल्यामुळे तुमच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे उपचाराअभावी माझ्या आईचा मृत्यू झाला. तुमच्या कार्यकर्त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. दरम्यान, जाधव बोलत असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘मला थांबवू नका मला बोलू द्या’, असं म्हणत जाधव यांनी बोलणं सुरूच ठेवलं.
जाधव यांच्या या भाषणाचा व्हिडिओ काही कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड केला. मात्र तो सक्तीने डिलीट करण्यात आला. परंतु काही कार्यकर्त्यांनी तो व्हिडिओ रिसायकलबिन मधून पुन्हा रिस्टोर खरंच संपूर्ण जिल्ह्यात तो व्हायरल केला.
खासदार डॉक्टर विखे यांनी मतदार संघातल्या अनेक गावांशी संपर्क न ठेवल्यामुळे आणि आश्वासने देऊन देखील कामे पूर्ण न केल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी मतदारांच्या रोषाला समोर जावं लागत आहे. कोरोना काळात अनेकांना मदत केल्याचा दावा खासदार डॉक्टर विखे यांनी केला असला तरी या व्हिडिओमध्ये तो दावा फॉल ठरल्याचे चर्चा जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे.