राजकारणउत्तरेतली सूज्ञ जनता खासदार लोखंडेंना दाखवणार 'कात्रजचा घाट'...!

उत्तरेतली सूज्ञ जनता खासदार लोखंडेंना दाखवणार ‘कात्रजचा घाट’…!

spot_img

लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर खासदार झालेले सदाशिव लोखंडे उत्तर नगर जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघात किती वेळा फिरले, त्यांना निवडून दिलेल्या मतदारांशी ते किती प्रामाणिकपणे वागले, केंद्र सरकारच्या कोणकोणत्या योजना त्यांनी मतदारसंघात राबविल्या, हा एक महत्त्वाचा आणि संशोधनाचा विषय झाला असून या वेळच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर नगर जिल्ह्यातली सूज्ञ जनता खासदार सदाशिव लोखंडे यांना ‘कात्रजचा घाट’ दाखवणार असल्याचं यानिमित्तानं बोललं जात आहे.

खासदार लोखंडे हे तर उत्तर नगर जिल्ह्यातल्या मतदारांच्या संपर्कात नाहीतच. पण त्यांचे चिरंजीव प्रशांत सदाशिव लोखंडे हेदेखील कोणाचाच फोन घेण्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळे यावर्षी लोकसभा निवडणुकीत दुसऱ्याच उमेदवाराला ‘लॉटरी’ लागण्याची जास्त शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे नक्की कुठे असतात? ते लोकांना का भेटत नाहीत? लोकांचे प्रश्न का जाणून घेत नाहीत? केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात ते आवाज का उठवत नाहीत? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत.

विधानसभेला जे झालं, तेच लोकसभेच्या निवडणुकीनंतही लोखंडे करत आहेत. कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आलं असताना त्यांचे डोळे पुसण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे पाच वर्षांत एकदासुद्धा उत्तर मतदार संघात फिरकले नाहीत. सत्तेची एवढी मस्ती त्यांना कशी आली, असा प्रश्न या निमित्तानं उत्तर लोकसभा मतदारसंघातली जनता विचारत आहे.

… आणि खा. लोखंडेंना झाली मतदार संघाची आठवण…!

गेली पाच वर्षे उत्तर नगर लोकसभा मतदारसंघात कोणाच्याच संपर्कात नसलेले खासदार लोखंडे आता फिरु लागले आहेत. आज (दि. ११) घोडेगावच्या (ता. नेवासा) परिसरात त्यांचा दौरा आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला असताना शेतकऱ्यांच्या भावना त्यावेळी तीव्र झाल्या होत्या. अशा परिस्थितीत खासदार लोखंडे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या नाहीत. मात्र निवडणूक तोंडावर आली असता आज त्यांना मतदारसंघातल्या जनतेची आठवण झाली. त्यांच्या अशा संधी साधू राजकारणाचा लोकांना प्रचंड वीट आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...