युवा विश्वलोकसभेची ही परिवर्तनाची निवडणूक ; विचार करुन मतदान करा : खासदार डॉ....

लोकसभेची ही परिवर्तनाची निवडणूक ; विचार करुन मतदान करा : खासदार डॉ. सुजय विखे यांचं कामोठेत आवाहन…!

spot_img

पारनेरच्या नगर पंचायतीचे नगराध्यक्ष विजय औटी यांच्या पुढाकारातून ‘आम्ही पारनेरकर’, कामोठे सांस्कृतिक युवा मंडळ आणि संदीप पाटील जनसेवा फाउंडेशन यांच्यावतीनं नवी मुंबईतल्या (वाशी) कामोठे इथं नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं. दि. 7 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला नोकरी, रोजगार आणि व्यवसायानिमित्त पारनेरमधून कामोठेत स्थलांतरित झालेल्या पारनेरकरांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य असा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना खासदार डॉक्टर सुजय विखे म्हणाले, ‘लोकसभेची ही निवडणूक दहशतवादी प्रवृत्ती संपवणारी आणि परिवर्तनाची ही निवडणूक आहे. मी केवळ विकासाच्या मुद्द्यावरच मत मागणार आहे. त्यामुळे विकासाची अपेक्षा असलेल्या मतदारांनी विचार करून मतदान करावं’.

नगराध्यक्ष विजय औटी म्हणाले, ‘सुपा एमआयडीसीत स्थानिक तरुणांना डावलून दहशतीचं काम पारनेरचे लोकप्रतिनिधी करत आहेत. त्यांच्या या दहशतीला सुजय विखे यांच्या माध्यमातून आम्ही सुरुंग लावणार आहोत. विखे यांच्या व्हिजनमुळे आगामी काळात स्थलांतरणाला आळा बसणार असून स्थानिक तरुणांना काम मिळणार आहे’.

दरम्यान, सुजय विखे यांच्या स्वरूपाने लोकसभेचा निकाल लागला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये पारनेरकर आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जनतेच्यावतीनं विखे हे आगामी काळात देशाच्या राजधानीत नेतृत्व करतील, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...