लेटेस्ट न्यूज़नगरच्या उड्डाणपुलाचं 'स्ट्रक्चरल ऑडिट' करा : काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची...

नगरच्या उड्डाणपुलाचं ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करा : काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची मागणी

spot_img

अहिल्यानगरमध्ये बांधण्यात आलेला बहुचर्चित उड्डाणपूल काही ठिकाणी रहदारीसाठी धोकादायक झाला असल्याचा आरोप करत या उड्डाणपुलाच्या बांधकामात कोणी कोणी टक्केवारी खाल्ली, याचा शोध घेऊन या उड्डाणपुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

या उड्डाणपुलाचा एका ठिकाणचा भाग कोसळून खाली रस्त्यावर पडला. सुदैवानं संभाव्य जिवितहानी टळली. संबंधितांच्या या बेजबाबदारपणाचा निषेध करत काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उड्डाणपूल बांधणाऱ्या संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

काळे यांनी या घटनेची दखल घेत नुकतंच ‘फेसबुक लाईव्ह’ करून सरकारी यंत्रणेचं याकडे लक्ष वेधून घेतलं. हा उड्डाणपूल जागोजागी धोकादायक झाला असल्याचं काळे यांचं म्हणणं असून उड्डाणपुलावरची लाइटिंगदेखील बंद असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, नगर दक्षिण लोकसभेचे खासदार डॉ. यांनी उड्डाणपुलाच्या कामाचं श्रेय जसं घेतलं, तसं एखादी दुर्घटना घडल्यास आणि त्यावेळी एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याचीसुद्धा जबाबदारी खासदार डॉ. विखे यांनी घ्यावी, असं आवाहन काळे यांनी यावेळी केलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...