गुन्हेगारी'तो' दुबईतून रॅकेट चालवतोय ; लोकांना मुर्खात काढतोय ; अखेर ईडीनं आवळला...

‘तो’ दुबईतून रॅकेट चालवतोय ; लोकांना मुर्खात काढतोय ; अखेर ईडीनं आवळला फास…!

spot_img

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा ‘मास्टरमाईंड’ विनोद तुकाराम खुटे हा सध्या दुबईत आहे. तिथूनच तो रॅकेट चालवून लोकांना मुर्खात काढतो आहे. अखेर सक्त वसूली संचालनालयानं (ईडी) फास्ट आवळले आणि विनोद खुटेसह त्याच्या सहकाऱ्यांचं सारंच बिंग फुटलंय.

ग्लोबल एफिलिएट बिझनेसच्या ॲपच्या माध्यमातून हा गोरखधंदा सुरु होता. खुटे हा गुगल प्ले स्टोअरवरुन लोकांना हे ॲप डाऊनलोड करायला सांगायचा आणि त्याद्वारे आर्थिक गुंतवणूक होत होती. या माध्यमातून विविध बनावट कंपन्या आणि बँक खात्याच्या माध्यमातून जमा झालेल्या 125 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हवालामार्फत भारताबाहेर नेण्यात आली आहे.

सन 2020 पासून या आर्थिक घोटाळ्यातल्या आरोपींनी ‘व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी’ आणि ‘ग्लोबल एलिफेट बिजनेस’ या दोन कंपन्या सुरू केल्या होत्या या माध्यमातून ते लोकांना दोन ते तीन टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवत होते.

चैन मार्केटसारखी पॉझी स्कीममध्ये लोकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडण्यात आले. अनेक गुंतवणूकदारांना कमिशन देण्याचं आमिष दाखवत अनेक लोकांना यामध्ये पैसे भरण्यास भाग पाडण्यात आलंय. महागडी घरं, आलिशान गाड्या, बोनस, हॉलिडे मेंबरशिप अशी आकर्षक आमिषं यावेळी दाखवण्यात आली.

विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, किरण पितांबर अनारसे, मंगेश सिताराम खुटे, अजिंक्य बडधे यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४७१, ३४, १२० ब अन्वये भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दि‌. ९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ‘ईडी’चे संचालक रत्नेशकुमार भुवनेश्वर कर्ण (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजजवळ असलेल्या निर्माण विवा सोसायटीमध्ये घडला होता.

कठोर शिक्षा आणि कारवाईची गरज…!

देशातला पैसा परदेशात नेण्याचं काम हवालामार्फत केले जातं. यामध्ये अनेक लोक सक्रिय आहेत. देशातल्या सामान्य लोकांना गरीब आणि कंगाल करण्याचे काम हे नराधम करत आहेत. फॉरेक्स ट्रेडिंग कंपनी आणि यासारख्या अनेक प्रकारच्या कंपन्यांच्या माध्यमातून आतापर्यंत कित्येकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारे यापुढे होणार नाही, यासाठी कायद्यात कठोर शिक्षा आणि कारवाईची तरतूद असायलाच हवी.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ने केला गुन्हा दाखल..!

दारूची बाटली व पाच हजार रुपये रोख लाच घेतल्याबद्दल तीन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...

गॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे तब्बल १० लाखांच्या खंडणीची मागणी.. एमआयडीसी पो.स्टे.ला गुन्हा दाखल..!

गॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे तब्बल १० लाखांच्या खंडणीची मागणी.. एमआयडीसी पो.स्टे.ला गुन्हा दाखल अहिल्यानगर (दि.२४ प्रतिनिधी):-एमआयडीसीत...

अहिल्यानगर एसीबी ची मोठी कारवाई. .! लाच घेतल्याप्रकरणी पं.समितीच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल…

अहिल्यानगर एसीबी ची मोठी कारवाई. .! लाच घेतल्याप्रकरणी पं.समितीच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल... यशस्वी सापळा...