राजकारणसत्ताधाऱ्यांना खासदारकी नाही, पण आमदारकी जड जाणार : मनोज जरांगे पाटलांनी टाकला...

सत्ताधाऱ्यांना खासदारकी नाही, पण आमदारकी जड जाणार : मनोज जरांगे पाटलांनी टाकला डाव…!

spot_img

लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती जास्त असते. या मतदारसंघात निवडणूक लढवायची असल्यास खूप मोठं प्लॅनिंग करावं लागतं आणि त्यासाठी कालावधी जास्त लागतो. परंतू लोकसभेच्या निवडणुकीसाठी कालावधी खूप कमी राहिला आहे. त्यामुळे मराठा समाजाचं यामध्ये नुकसान होऊ शकतं. त्यासाठी लोकसभा निवडणुकीत फक्त एका जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार द्यायचा.

आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र एकाच जिल्ह्यात अनेक उमेदवार द्यायचे, असा डाव मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी पक्षांवर टाकला आहे. त्यांच्या या डावामुळे सत्ताधाऱ्यांना लोकसभेत नाही, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड डोकेदुखी होणार असून विधानसभेची निवडणूक सत्ताधाऱ्यांना जड जाणार आहे, असंच एकंदरीत चित्र सध्या दिसू लागलं आहे.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार किती द्यायचे आणि याची रणनिती कशी आखायची, यासंदर्भात येत्या 30 मार्च रोजी मराठा समाजाची बीड इथं बैठक होणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलंय.

काल म्हणजे दि. 24 रोजी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाची मोठी सभा पार पडली. या सभेत लोकसभेचं रणांगण कमी प्रमाणात गाजवायचं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना ‘पळता भुई थोडी’ करायची असं ठरलं. कारण जरांगे पाटलांच्या मतानुसार आरक्षणाचा विषय हा राज्य सरकारशी संबंधित आहे. त्यामुळे मराठा, दलित, मुस्लिम असे जास्तीत जास्त उमेदवार जर विधानसभेत गेले तर हा प्रश्न सोडविणे फारसे कठीण जाणार नाही, असा त्यांचा विचार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत कमी पण विधानसभेच्या निवडणुकीत मराठा, समाजासह दलित आणि मुस्लिम समाजाचे उपद्रव मूल्य प्रचंड वाढणार आहे. या सगळ्यांचं नेतृत्व जरांगे पाटील करणार आहेत. त्यामुळे विधानसभेत प्रचंड गोंधळ होईल, अशी परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...