मराठा समाजाची निर्णायक सभा जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं आज (दि. २४) भर उन्हातच पार पडली. लाखो मराठा समाजामध्ये या सभेला उपस्थित होते. मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा समाज बांधवांना संबोधित केलं.
जरांगे पाटील म्हणाले, ‘लोकसभेच्या निवडणुकीसाठी हजारो उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे मराठा समाजाच्या मतांची विभागणी होऊ शकते त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला त्याचा फायदा मिळू शकतो. हे वास्तव ध्यानात घेऊन एका जिल्ह्यात एकच उमेदवार अर्ज दाखल करा. उमेदवारी कोणाला द्यायची, हे तुम्हीच ठरवा. मी काहीही सांगणार नाही’.
दरम्यान, आदल्या दिवशीच (दि. २३) या सभेसाठी हजारो मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीचा मुक्कामाला आले होते. सभेसाठी जो मंडप उभारण्यात आला होता, तोदेखील कमी पडला. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा हा ‘गनिमी कावा’ किती परिणामकारक ठरु शकतो, हे आता पहावं लागणार आहे.
भाजपनं अशी लावली भांडणं…!
लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं संभाव्य चुरशीच्या निवडणुकीवर आपण जर बारकाईनं लक्ष दिलं तर भाजपनं कशी भांडणं लावली हे लक्षात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि मराठा विरुद्ध मराठा अशी भांडण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपनं लावल्याचं पहायला मिळत आहे.