लेटेस्ट न्यूज़टँकरच्या पाण्यातली भ्रष्ट शेवाळं - भाग २ रा

टँकरच्या पाण्यातली भ्रष्ट शेवाळं – भाग २ रा

spot_img

दुष्काळी स्थितीत तहानलेली माणसे व जनावरे यांना पुरेसे पाणी प्यायला मिळावं म्हणून जनजागृतीसाठी सदर लेख मालिका सुरु आहे. शासनाने हजारो करोड खर्च करुनही जनतेची तहान भागणार नसेल तर काहीच उपयोग नाही.

सन २०२४ करिता एकट्या नगर जिल्ह्याचा केवळ पिण्याच्या पाण्याचा आराखडा ८३ कोटीचा आहे. त्यापैकी किमान १३ कोटीचे तरी पाणी लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.

यापूर्वी नगरला सुमारे १२५ करोड रुपये पिण्याचे पाण्याचा खर्च कागदोपत्री झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील थोर समाजसेवकाच्या चेल्यांनी हैदोस घालत नंगानाच केला होता. मात्र एका वृत्तपत्र समुहाने स्टिंग ऑपरेशन करत भ्रष्टाचार उघड केला. त्यानंतर किमान थोडंफार पाणी लोकांना प्यायला मिळालं. यांचे टँकर मुंबईला आणि कागदोपत्री नगरला दाखवले त्यामुळे चेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले.

तहानलेली जनता व जनावरांच्या साठी प्रत्येक तालुक्यातून स्वयंस्फुर्तीने युवकांनी सहभागी होवून शासन निर्णय व कायद्याची अंमलबजावणी करण्यास प्रशासनास भाग पाडावे. कागद घेवून तालुक्याला तुमचा आठवड्यातील एक चक्कर प्रशासनास रेषेत आणू शकतो. त्याकरिता माहिती अधिकार कायद्याचा योग्य रित्या वापर करावा.

सन २००७-०८ मध्ये काही टँकर ड्रायव्हरने तक्रारी दाखल करत भ्रष्टाचार उघड केला होता. त्यात सात BDO आणि पाच तहसीलदार खपले होते. नोकऱ्या गेल्याने त्यातील काही तहसीलदार नंतर राजकारणात सुद्धा दिसले होते.

लोकं प्याऊ, पानपोई उघडतात. पाण्यासाठी दानधर्म करतात. आपणही आपलं कर्तव्य समजून पुढे येवून टँकर द्वारे पिण्याच्या पाण्यातील भ्रष्टाचारी शेवाळं काढून फेकून लोकांपर्यंत पाणी पोहोचण्यास सहाय्यक होवूयात. सनदशीर मार्गाने आपणास हवे ते सहकार्य आमचे कडून केले जाईल. धन्यवाद.

संकल्पना : 
पोपट सूर्यभान आघाव
Watsapp नं. ८२७५२०१३२१
मो.नं. ७५१७२००२००

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...