35 हजार रुपयांची नोकरी सोडून ‘ही’ महिला करते ‘हा’ व्यवसाय ! वर्षाला कमावते 40 लाख रुपये !

spot_img

35 हजार रुपयांची नोकरी सोडून ‘ही’ महिला करते ‘हा’ व्यवसाय ! वर्षाला कमावते 40 लाख रुपये !

एखादी महिला महिन्याला जर 35 हजार रुपये पगाराची नोकरी करत असेल तर ती वर्षाला फार फार तर चार लाख वीस हजार रुपये कमवू शकते. मात्र कुठे चार लाख वीस हजार आणि कुठे चाळीस लाख रुपये? अशाच पद्धतीने वेगळा विचार करून एका महिलेने पस्तीस हजार रुपये पगार असलेली नोकरी सोडून एक असा आगळावेगळा आणि जास्तीत जास्त पैसा मिळवून देणारा व्यवसाय निवडला. आज ती महिला दरवर्षी चाळीस लाख रुपये कमवते. हा कुठला व्यवसाय आहे, हे आपण आज जाणून घेऊया.

उत्तरप्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातली प्युशिका यादव ही महिला शिक्षिका होती. तिला दर महिन्याला 35 हजार रुपये पगार मिळत होता. मात्र तिने ती नोकरी सोडून दिली आणि मासे पालन हा व्यवसाय fish food businesse करायला सुरुवात केली. सन 2020 मध्ये या महिलेने तिच्याकडे असलेल्या तीन हेक्टरमध्ये तीन तलाव तयार केले. त्यामध्ये मासे पालन करून या व्यवसायाला सुरुवात केली.

स्थानिक शेतकऱ्यांनी या महिलेकडे संबंधित व्यवसायाची चौकशी केली आणि या व्यवसायात पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. या महिलेने अनेक अप्रशिक्षित शेतकऱ्यांना या व्यवसायाची माहिती दिली आणि या सर्वांच्या माध्यमातून या महिलेने हा व्यवसाय वाढविला. आज या व्यवसायाच्या माध्यमातून ती महिला वर्षाकाठी चाळीस लाख रुपये उत्पन्न घेत असून ही महिला 30 टन मासे उत्पादन करीत आहे आहे.

महिलेच्या व्यवसायातून प्रेरणा घेऊन तुम्हीदेखील अशा प्रकारचे व्यवसाय करू शकता. एक महिला जिला सबला म्हटलं जातं, त्या महिलेने हा मोठा चमत्कार करून दाखवला. या व्यवसायाच्या माध्यमातून ती महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली. त्यामुळे महिलांना व्यावहारिक ज्ञान नाही, असं म्हणणं योग्य नाही. एक महिला स्वतःच्या हिंमतीवर नक्कीच प्रगती करू शकते, हे उत्तर प्रदेशमधल्या या महिलेने प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवून दिले आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :