31 डिसेंबरपर्यंत कार खरेदी करा आणि करा ‘इतकी’ आर्थिक बचत!

spot_img

(बातमी संदर्भात आपल्या कॉमेंट्स आम्हाला 9890006212 या whatsapp नंबर वर पाठवू शकता)बंगल्यासमोर चारचाकी वाहन असलं, की मग कुठंही ‘लाँग रुट’वर Long Root जाण्याचा निर्णय घेता येतो. आता कार विक्री करणार्‍या कंपन्यांनी ग्राहकांना अनेक प्रकारच्या आॅफर्स Offer’s देऊ केल्या आहेत. या बातमीतून कोणत्या कंपनीनं किती आॅफर्स दिली आहे, याची तुम्हाला माहिती मिळणार आहे. मात्र 31 डिसेंबरपर्यंत जर तुम्ही कार खरेदी केली, तर तुम्ही 1 लाख 50 हजार रुपयांची बचत करु शकता.

टाटा मोटर्सकडून TATA Moter’s तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत जर कोणतीही कार खरेदी केली तर तुम्हाला 65 हजार रुपयांची सूट मिळेल. या कंपनीच्या विविध वाहनांवर अनेक आॅफर्स देण्यात आल्या आहेत. टाटा मोटर्सच्या सफारी, हॅरियर, टियागो आणि टिगो या वाहनांवर जास्तीत जास्त आॅफर्स उपलब्ध आहेत.

रेनाॅल्टच्या Renault किगर आणि ट्रायबर Kigar & Tryber या कारवर तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. रेनाॅल्ट क्विडवर Renault Kwid 35 हजार रुपयांची सूट आहे.

जपानची कंपनी होंडा Honda कारवर तर तुम्हाला चक्क 72 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. मध्यम आकाराच्या काॅम्पॅक्ट SUV Honda WR – V (पेट्रोलवर चालणारी कार) वर या कंपनीनं तुम्हाला भरपूर सूट दिली आहे. जपानी Honda कारवर 72 हजार 340 रुपयांची सूट देण्यात आलीय. याशिवाय Honda WR-V, Honda Jazz, Honda City 4th Generation आणि 5th Generation New Honda Amaze कारच्या खरेदीवर देखील अनेक प्रकारच्या ऑफर मिळणार आहेत.

हुंडाई कार खरेदीवरदेखील तुम्हाला Hyundai मोठी सूट देण्यात आलीय. या कंपनीच्या Aura Grant i 10 Nios, Kona इलेक्ट्रिक आणि i 20 या माॅडेल्सवरही मोठ्या प्रमाणावर सूट दिली जाते. Hyundai कडून Grand i10 Nios वर 63,000 रुपयांपर्यंत, i20 वर 30,000 रुपये आणि Aura वर 43,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जाते आहे. त्याचबरोबर Hyundai इलेक्ट्रिक कार Kona च्या खरेदीवर ग्राहकांना जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जाते आहे.

या आॅफर्स फक्त 31 डिसेंबरपर्यंतच आहेत. त्यामुळे नवीन वर्ष 2023 च्या आधीच तुम्ही कार खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला ही फार मोठी संधी आहे. ही माहिती ढोबळ मानानं देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कार शोरुममध्ये चौकशी करु शकता.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :