पुणे पोलिसांच्या तपास पथकानं जप्त केलेल्या 3 हजार 500 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणाचा मुख्य आरोपी बिहारचा संदीप धुनिया असल्याचं समोर आल्यानंतर त्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट असल्याचं वास्तव समोर आल आहे. पुणे पोलीस लवकरच त्या रेड कॉर्नर नोटीस बजावणार आहेत.
पुणे पोलिसांनी या प्रकरणात यापूर्वी वैभव उर्फ पिंट्या भारत माने (रा. सोमवार पेठ,पुणे), अजय अमरनाथ कोरोशिया (राहणार भवानी पेठ पुणे), हैदर नूर शेख (राहणार विश्रांतवाडी पुणे) आणि भिमाजी परशुराम साबळे यांच्यासह अनेकांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणातला मुख्य सूत्रधार धुनिया हा मूळचा बिहारचा राहणार असून त्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे.
मुख्य सूत्रधार संदीप धुनिया हा 30 जानेवारी रोजी नेपाळ (काठमांडू) येथे गेला होता. तिथं त्यानं ड्रग्ज ठेवण्यासाठी जागा शोधली होती. 3 हजार 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज नेपाळच्या काठमांडू इथून लंडनला पाठवण्यात येणार होतं, अशी माहिती पुणे पोलिसांना मिळाली. या प्रकारणातला मुख्य सूत्रधार धुनिया आणि इतर आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहितीदेखील पोलिसांना मिळाली आहे. संदीप धुनिया आणि विपिनकुमारची पत्नी सोनम पंडीत यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते.
राज्यातल्या विविध प्रकारच्या केमिकल कंपन्यांमध्ये निर्माण होत असलेल्या ड्रग्जच्या प्रक्रियेमुळे राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या होत्या. मात्र त्या सूचनांकडे या कंपन्या सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचा देखील समोर आलं आहे.