युवा विश्व24 मार्च रोजी अंतरवलीत होणार महाराष्ट्राची महासभा : 'संघर्ष योद्धा' मनोज जरांगे...

24 मार्च रोजी अंतरवलीत होणार महाराष्ट्राची महासभा : ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

spot_img

राज्य सरकारनं मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही. मराठा समाजाच्या सगेसोयऱ्यांच्या संदर्भात अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही. गॅझेट काढण्यात आलं नाही. त्यामुळे मराठा समाज प्रचंड नाराज झाला असून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं दि. 24 मार्च रोजी महाराष्ट्राची महासभा होणार आहे, अशी घोषणा मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये सध्या मराठा संवाद यात्रा सुरु आहे. नुकतीच जरांगे पाटील यांची राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड इथं भेट घेत जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘जरांगे पाटलांचा संघर्ष हा समाजासाठी आहे. समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे सरकारने समाजाचा विचार करायला हवा. मी त्यांची भेट सरकार म्हणून नाही तर मराठा समाजाचे एक पाईक म्हणून घेतली आहे’.

जरांगे पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी समाज बांधव म्हणून चर्चा केली. ही चर्चा दार उघडं ठेवून करण्यात आली, ही विशेष. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, सग्यासोयऱ्यांच्या संदर्भात अधिसूचना काढण्यात यावी, मराठा आरक्षणा संदर्भात निर्णय घ्यावा अशी अपेक्षा असताना सरकारने अपेक्षाभंग केला आहे. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी
24 मार्च रोजी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते, साखळी उपोषणकर्ते, रॅलीचे आयोजक या सर्वांनी अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहायचं आहे’.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...