2024 पूर्वीच भारत अमेरिकेची बरोबरी करणार! केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा आत्मविश्वास

spot_img

2024 पूर्वीच भारत अमेरिकेची बरोबरी करणार! केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा आत्मविश्वास..

भारतातले रस्ते हा खरं तर इथल्या विकासातला आतापर्यंतचा महत्वाचा अडसर ठरला आहे. मात्र पायाभूत सुविधा निर्माण करताना त्या दर्जेदार कशा होतील, हेदेखील सध्या पाहिलं जात आहे. त्यामुळेच 2024 पूर्वीच भारत हा अमेरिकेची बरोबरी करणार असल्याचा आत्मविश्वास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय.

FICCI च्या 95 व्या वार्षिक परिषदेला ते संबोधित करताना बोलत होते. जगातल्या 40 टक्के संसाधन वापरणार्‍या क्षेत्रांमध्ये बांधकाम उद्योगाविषयी बोलताना केंद्रीयमंत्री गडकरी म्हणाले, ‘बांधकाम क्षेत्रात इतर पर्यायांचा वापर करुन स्टीलचा वापर कमी करण्यावर आम्ही भर देत आहोत.

बांधकाम उद्योग केवळ प्रदूषणवाढीलाच हातभार लावत नाही तर वाळू, सिमेंट, खडी अशा 40 टक्के संसाधनाचा वापर या उद्योगात केला जातो. अशा परिस्थितीत बांधकामाचा दर्जा सुधारण्यासह संसाधनाचा कमीत कमी वापर यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

दरम्यान, ऊर्जा निर्यातदार म्हणून भारत स्वत:ला प्रस्थापित करण्याच्या चांगल्या स्थितीत आहे. नजिकच्या काळात ग्रीन हायड्रोजन हा ऊर्जेचा मोठा स्रोत असेल, असंही सांगून हरित हायड्रोजन हा भविष्यात विमान वाहतूक, रेल्वे, रस्ते वाहतूक, रासायनिक आणि खत उद्योगांमध्ये ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत असेल, असंही गडकरींनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :