2000 किलो गोमांससह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त ; कोतवाली पोलिसांची दमदार कारवाई !
दि.१७/०४/२०२३ रोजी रात्री कोतवाली पोलीसांना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली, की अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरातून काही गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले मांस भरुन एक पिकअप वाहन झेंडीगेट परिसरातून हॉटेल अशोकाजवळून बीएसएनएल ऑफीसच्या मार्ग जाणार आहे.
त्या माहितीनुसार स्वतः पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व गुन्हे शोधपथक यांनी बीएसएनएल ऑफीसच्या परिसरात सापळा लावला. तेवढ्यात अशोका हॉटेलच्या दिशेने एक पांढ-या रंगाचा पिकअप हा संशयितरित्या येतांना दिसला. त्यास पोलीस पथकाची चाहुल लागताच पोलीस पथकापासून काही अंतरावर आल्यानंतर त्याने त्याचे ताब्यातील पिकअप गाडी रस्त्याचे कडेला सोडून तेथून पळून गेला.
पथकाने सदर गाडीची पाहणी केली असता सदर पिकअप गाडीमध्ये गोवंशीय जनावरांचे मांस मिळून आले. सदर पिकअप मध्ये ४,००,०००/-रु किंमतीचे लहान मोठे आकाराचे गोवंशीय जनावरांचे मांसाचे तुकडे सुमारे २००० किलो वजनाचे गोमांस, व २,००,०००/- रु किया एक पांढ-या रंगाचा पिकअप असा एकुन ६,००,०००/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
गाडीवरील फरार चालक असून अब्दुल हक कुरेशी (रा झेंडीगेट, अहमदनगर ) याच्याविरुध्द याप्रकरणी कोतवाली पोस्टे गुरनं ३७७/२०२३ भादंवि कलम २६९, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५ (क). ९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक योगेश अशोक भिंगारदिवे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस नाईक अब्दुल कादर परवेज इनामदार हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोहेकॉ तनवीर शेख, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोहेकॉ सतिष भांड पोना योगेश भिंगारदिवे, पोना अब्दुल कादर इनामदार, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अमोल गाढे,सुजय हिवाळे, सागर मिसाळ, अतुल काजळे, श्रीकांत खताडे, प्रशांत बोरुडे यांच्या पथकाने केली.