लेटेस्ट न्यूज़2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद......

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह 5 घरफोडीच्या गुन्हयांची उकल!

spot_img

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद…
आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह 5 घरफोडीच्या गुन्हयांची उकल!
अहिल्यानगर – प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दि.18/05/2025 रोजी फिर्यादी किरण विश्वनाथ खैरे, रा.भोरवाडी, ता.अहिल्यानगर हे कुटूंबियासह घरात झोपले असताना अज्ञात चोरटयांनी घरात प्रवेश करून, कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागीने व रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेला.याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.441/2025 बीएनएस कलम 331 (4), 305 (अ) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.

मा.पोलीस अधिक्षक,अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्हयातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज लातुरकर, प्रशांत राठोड व मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमुण घरफोडी गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

दिनांक 26/05/2025 रोजी पथक वर नमूद घरफोडीच्या गुन्हयाचा गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा हा राजेश अशोक काळे, रा.रांजणगाव मशीद, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासह केल्याची असुन तो सध्या राहते घरी असल्याची माहिती मिळाली. पथकाने आरोपीचा राहते घरी जाऊन शोध घेऊन 1) राजेश अशोक काळे, वय 24, रा.रांजणगाव मशीद, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने मागील चार ते पाच दिवसापुर्वी भोरवाडी गावचे शिवारात 2) राहुल चंदर भोसले, रा.खरातवाडी, पिंपळगाव पिसा, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर (फरार) व 3) प्रदीप उर्फ खुटल्या आरकास काळे, रा.रांजणगाव मशीद, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर (फरार) याचेसह केल्याची माहिती सांगीतली.

ताब्यातील आरोपी राजेश अशोक काळे यास विश्वासात घेऊन, आणखी कोठे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस केली असता त्याने वरील साथीदारासह निघोज, राळेगणसिध्दी, चिंचोली, वाडेगव्हाण ता.पारनेर व शिर्डी येथील घरफोडीचे गुन्हे केल्याची सांगीतलेल्या माहितीवरून, पोलीस स्टेशनचे अभिलेख पडताळणी करून खालीलप्रमाणे घरफोडीचे 05 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 पारनेर 322/2025 बीएनएस 331 (4), 303 (2)
2 पारनेर 316/2025 बीएनएस 303 (2)
3 पारनेर 291/2025 बीएनएस 331 (4), 305
4 सुपा 15/2025 बीएनएस 331 (4), 305 (अ)
5 शिर्डी 464/2024 बीएनएस 331 (4), 303

ताब्यातील आरोपीकडे घरफोडी गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केलेले दागीने हे बाबा किसन शेंडगे, रा.खरातवाडी, पिंपळगाव पिसा, ता.श्रीगोंदा यास विक्रीसाठी दिल्याची माहिती सांगीतली.त्यावरून पथकाने नमूद आरोपीचा शोध घेऊन पंचासमक्ष बाबा किसन शेंडगे, वय 60, रा.खरातवाडी, पिंपळगाव पिसा, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन त्याचेकडून 1,19,000/- रू किंमतीचे त्यात 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने तपासकामी जप्त केले आहे.तसेच इतर चोरीचे सोन्याचे दागीने हे बेलवंडी, ता.श्रीगोंदा येथील सोनारास विक्री केल्याची माहिती सांगीतली.

ताब्यातील आरोपी राजेश अशोक काळे याचेवर दाखल गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता तो खालीलप्रमाणे दरोडा व घरफोडीच्या गुन्हयात फरार असल्याचे निष्पन्न झाले.याबाबत पुढील कारवाई करण्यात येत आहे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 चाकण पोलीस स्टेशन 719/2024 बीएनएस 310(2), 311
2 शिक्रापुर पोलीस स्टेशन 310/2024 भादंविक 396
3 चाकण पोलीस स्टेशन 81/2025 बीएनएस 331(4), 305 (अ)
4 चाकण पोलीस स्टेशन 503/2024 बीएनएस 331(4), 305 (अ)
5 चाकण पोलीस स्टेशन 597/2024 बीएनएस 331(4), 305 (अ)
6 चाकण पोलीस स्टेशन 131/2024 भादंविक 454, 457, 380

ताब्यात घेण्यात आलेल्या 02 आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, व मा.श्री.संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी…! निलंबित मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक...

मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी...! निलंबित मनपा आरोग्य...

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण ताबडतोब लागू करा..! सकल मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चात लाखो नागरिकांची मागणी:

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण ताबडतोब लागू करा..!सकल मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चात लाखो...

सकल मातंग समाजाचे आक्रोश महाआंदोलन! अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण जून २०२५ पासून लागू करण्याची मातंग समाजाची मोठी मागणी… – आमदार अमित गोरखे

सकल मातंग समाजाचे आक्रोश महाआंदोलन! अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण जून २०२५ पासून लागू करण्याची मातंग...