लेटेस्ट न्यूज़17 गोवंशीय जनावरांची सुटका ; अहिल्यानगर एलसीबी ची कारवाई...!

17 गोवंशीय जनावरांची सुटका ; अहिल्यानगर एलसीबी ची कारवाई…!

spot_img

17 गोवंशीय जनावरांची सुटका ; अहिल्यानगर एलसीबी ची कारवाई…!

महासत्ता भारत / अहिल्यानगर

जिल्हा पोलीस अधीक्षक
राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
या आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश धोत्रे, शाहीद शेख, सोमनाथ झांबरे, रोहित मिसाळ, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, मनोज लातुरकर, उमाकांत गावडे आणि अरूण मोरे अशांचे पथक तयार करुन कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवली असल्यास त्यावर कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.

दि.17/05/2025 रोजी पथकातील पोलीस अंमलदार यांनी कर्जत शहरामध्ये मिळालेल्या माहितीवरून 03 वेगवेगळया ठिकाणी कत्तल करण्याचे उद्देशाने गोवंशीय जनावरे निदर्यतेने डांबून ठेवल्याचे दिसून आल्याने त्याठिकाणी पंचासमक्ष छापे टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये कर्जत पोलीस स्टेशनला खालीलप्रमाणे 03 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये 2 लाख 15 हजार रूपये किंमतीची 17 गोवंशीय लहान मोठी जनावरे ताब्यात घेण्यात आली.

या कारवाईत मुन्ना हुसेन कुरेशी, रा. कुरेशी मोहल्ला, कर्जत (फरार)
2 कर्जत पोलीस स्टेशन गुरनं 307/2025
गोवंशीय जनावरे 6 1. आतीक कुरेशी 2. निसार कुरेशी पुर्ण नाव माहित नाही
दोन्ही (रा. कर्जत), ता. कर्जत (फरार), जनावरे 5 1. अशोक बाजीराव लोंढे, रा. थेरवाडी, ता. कर्जत (फरार)
शोएब कुरेशी, रा.कर्जत, ता.कर्जत (फरार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे,अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर आणि विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सकल मातंग समाजाचे आक्रोश महाआंदोलन! अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण जून २०२५ पासून लागू करण्याची मातंग समाजाची मोठी मागणी… – आमदार अमित गोरखे

सकल मातंग समाजाचे आक्रोश महाआंदोलन! अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण जून २०२५ पासून लागू करण्याची मातंग...

बुद्ध पौर्णिमेनिमित्त निलक्रांती चौक मित्र मंडळातर्फे थंडगार शितपेय आणि सरबताचे वाटप..

बुद्ध पौर्णिमेनिमित्त निलक्रांती चौक मित्र मंडळातर्फे थंडगार शितपेय आणि सरबताचे वाटप.. दरवर्षीप्रमाणे निलक्रांती चौक मित्र...

आपापसात वाद मिटविणे महत्वाचे: न्यायाधीश अंजू शेंडे…  राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

आपापसात वाद मिटविणे महत्वाचे: न्यायाधीश अंजू शेंडे...  राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन अहिल्यानगर, ता. १०: प्रत्येकाला आपले हक्क...

मंत्री संजय शिरसाठ साहेब, मातंग समाजाच्या उद्धारासाठी काही तरी करा; लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्ष नियुक्ती करा व बजेट वाढवा…!

मंत्री संजय शिरसाठ साहेब, मातंग समाजाच्या उद्धारासाठी काही तरी करा;  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक...