सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेली तेलुगु अभिनेत्री सौम्या शेट्टी या अभिनेत्रीविरुद्ध तब्बल 150 तोळे सोनं सोडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तिला वैझाग शहर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. कल्याण विशाखापट्टणममधल्या दोंडापार्ती इथल्या बालाजी मेट्रो रेसिडेन्सी मध्ये 23 फेब्रुवारी ही चोरी झाली होती. दरम्यान, याप्रकरणी प्रसाद बाबू यांनी पोलिसांना तक्रार दिली.
या चोरी प्रकरणी पोलिसांनी संशयित असलेल्या 11 जणांची चौकशी केली होती. त्यामध्ये अभिनेत्री सौम्या शेट्टीचाही समावेश होता. विशाखापट्टणमच्या सेवानिवृत्त पोस्ट कर्मचाऱ्यांच्या घरात सौम्या शेट्टी हिने 150 तोळे सोन्याची चोरी केली होती असा तिच्याविरुद्ध आरोप आहे. सौम्या हिने चार वेगवेगळ्या प्रकरणात ही चोरी केल्यानंतर ती गोव्याला फिरायला गेली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
अभिनेत्री सोमा शेट्टी ही प्रसाद बाबू यांच्या बाथरूममध्ये गेली. तिथून प्रसाद बाबू यांच्या बेडरूममध्ये गेली आणि त्याठिकाणी असलेलं एक किलो सोनं तिनं चोरुन नेलं. तिला अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिने सोनं चोरल्याचा गुन्हा तिनं कबूल केला.