14 डिसेंबरला हिंदू जन आक्रोश मोर्चा! शहर शिवसेनेचा पाठिंबा तर आरपीआय गवई गटाचा विरोध!

spot_img

लव्ह जिहादचा विषय शहरात अत्यंत गंभीर झाला आहे. या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा होण्याची गरज आहे. यासंदर्भात शिवसेनेने यापूर्वीही अनेकवेळा भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे या मोर्चाला पाठिंबा देण्यासंदर्भात संपर्कप्रमुख आमदार सुनिल शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांची चर्चा झाली.

दरम्यान, आरपीआयच्या गवई गटाने या मोर्चाला विरोध करत परवानगी देऊ नये, अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.

आरपीआयच्या गवई गटाने या मोर्चाला विरोध केला आहे. शहरामध्ये जातीयवादातून घटना घडल्या आहेत. जातीयविरोधी मोर्चा काढून नेमके काय सिद्ध करायचे आहे. नगर शहरामध्ये मोठी दंगल घडवण्याचा कट तर कोणी रचत नाही ना? मोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल करत शहराची शांतता भंग होऊ नये, पुढील अनर्थ टाळण्यासाठी मोर्चास परवानगी देऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तर नगर शहरात लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने १४ डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या हिंदू जन आक्रोश मोर्चाला नगर शहर शिवसेनेच्यावतीने (उध्दव ठाकरे गट) पाठिंबा देण्यात आल्याची माहिती शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली.

या बैठकीत हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्याचा आणि मोर्चाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचे शहर प्रमुख कदम यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :