‘महासत्ता भारत’ बिग ब्रेकिंग..! अहमदनगरच्या उड्डापुलावरून खाली पडून एक जण गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याकडे जात असताना एक दुचाकीस्वार स्टेट बँक चौक ते चांदणी चौकादरम्यान असलेल्या वळणावर उड्डाणपुलावरून खाली पडला. या अपघातात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला.
घटनास्थळी जमलेल्या लोकांपैकी काहींनी त्या तरुणाला ताबडतोब खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेलं. या तरुणाच्या दुचाकीचा वेग ताशी 80 इतका होता. या दरम्यान उड्डाणपुलाला असलेल्या वळणावर हा तरुण खाली पडला. मात्र त्याची दुचाकी उड्डाणपुलावरच राहिली.
या विचित्र अपघाताबद्दल नगर शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.