1000 टक्क्यांपेक्षा रिटर्न्स देऊनही ‘हे’ शेअर्स आजही तेजीतच!

spot_img

शेअर बाजारात गुंतवणूक करणं, हे कोणाचंही काम नाही. त्यासाठी इकाॅनाॅमिक कन्सल्टंट्सच्या Economic Consultant’s सल्ल्याची खूप आवश्यकता भासते. कुठल्याही सल्ल्याशिवाय शेअर बाजारात केलेली गुंतवणूक पश्चात्तापाशिवाय काहीच देत नाही. शेअर बाजारात कितीही परतावा Return’s दिला तरी आर्थिक तेजी कायम ठेवणारे असे काही शेअर्स आहेत. या लेखातून आपण ते जाणून घेणार आहोत.

सेजल ग्रुप आॅफ इंडस्ट्रिजची सेजल ग्लास प्रमुख कंपनी आहे. या स्माॅल कॅच कंपनीची Small Cach Company स्थापना 1998 मध्ये झाली. ग्लास म्हणजे काचेच्या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. आज ही कंपनी भारतातल्या ग्राहकांच्या गरजा, सोयी, प्राधान्ये आणि विश्लेषण यांची पूर्तता करते. या कंपनीचं भागभांडवल 238 कोटी रुपये आहे. या कंपनीनं सुमारे 1638 परतावा Return’s दिलाय.

अंबर प्रोटीन इंडस्ट्रिजच्या स्टाॅकनं ग्राहकांना चांगला परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सच्या ज्या किंमती आहेत, त्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. या कंपनीची स्थापना 1992 मध्ये अहमदाबाद येथे झाली. 549 रुपयांवर सध्या या कंपनीचा शेअर आहे. या शेअरनं 843 रुपयांचा 52 आठवड्यांचा निचांकी स्तर गाठला होता. या कंपनीचं बाजार भांडवर 262 . 20 कोटी आहे.

राज रेयाॅन इंडस्ट्रिज लिमिटेडच्या शेअरनं एका वर्षात गुंतवणूकदारांना 1570 रुपयांचा परतावा Return’s दिला आहे. राज रेयाॅन इंडस्ट्रिज लिमिटेड ही कंपनी पूर्वी राज रेयाॅन लिमिटेड या नावानं ओळखली जात होती. ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 34 रुपये आणि निचांकी स्तर 0 . 34 होता. कंपनीचं भागभांडवल 1921 कोटी आहे. या कंपनीचा शेअर अजूनही तेजीत आहे.

केसर काॅर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी मुद्रण आणि पॅकेजिंग Printing & pakeging सेवा देते. या स्माॅल कॅप कंपनीच्या स्टाॅकनं एका वर्षात 13 900 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचं भागभांडवल 309 कोटी रुपयांचं आहे. या कंपनीचा शेअर सध्या 56.50 रुपयांवर आहे. केसर काॅर्पोरेशनचा शेअर 57 रुपयांच्या पातळीवर उघडला आहे.

अशा प्रकारे कोणत्या कंपन्यांचं भागभांडवल किती, त्या कंपनीच्या शेअरची मार्केट व्हॅल्यू Market Vallu काय, त्या कंपनीनं ग्राहकांना किती रुपयांचा परतावा Return’ दिलाय, याचा अभ्यास करुनच शेअर खरेदी करायला हवाय.

बाॅलिवूडमध्ये व्यवस्थित सेटल Setal झालेले अनेक अभिनेते शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये गुंतवातात आणि कंपन्या त्यांना कोट्यवधी रुपयांचा परतावा Return’s देतात. म्हणून शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणं हे कोणाचंही काम नाही, असं म्हटलं जातं.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :