दुचाकीच्या किंमतीत कार मिळते, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं, तर त्याला तुम्ही वेड्यात काढाल. अर्थात यामध्ये तुमची काहीच चूक नाही. पण मग हा काय नवा फंडा आहे, असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी ही बातमी काळजीपूर्वक वाचा…!
कुटुंबातले चार सदस्य आणि त्यांच्यासोबत तुम्ही जर लांबच्या प्रवासाला जाण्याचा विचार केला असेल तर त्यासाठी तुम्हाला दुचाकी नक्कीच योग्य ठरणार नाही. अशा प्रवासासाठी तुम्हाला चार चाकी कारशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नाही. परंतु वाढत्या महागाईच्या काळात कार खरेदी करणं, हे प्रत्येकाला शक्य होत नाही. मात्र काळजी करण्याचं कारण नाही. कारण आता एक लाख पन्नास हजार रुपयांत दुचाकी येते. मात्र तेवढंच ‘डाऊन पेमेंट’ भरून जर तुम्ही कार घेण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही योग्य निर्णय घेतला, असं आम्ही म्हणू.
होय, हे खरं आहे. अल्टो के १० या कारची किंमत सहा लाख पन्नास हजार रुपये असली तरी दीड लाख रुपये डाऊन पेमेंट भरून तुम्ही ही कार तुमच्या घरी नेऊ शकता. उर्वरित पाच लाखांवर तुम्हाला लोन म्हणजे कर्ज मिळू शकतं आणि दर महिन्याला फक्त आठ हजार रुपये हप्ता भरुन ही कार तुमच्या मालकीची होऊ शकते.
… आता जाणून घ्या या कार विषयी…!
या कारच्या टॉप सीएनजी मॉडेलची ऑन रोड किंमत ६ लाख ५६ रुपये आहे. एक किलो सीएनजी गॅसमध्ये ही कार 34 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते. या कारमध्ये तीन सिलेंडरसह ९९८ सी. सी. चं इंजिन आहे. या कारमध्ये टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, पॉवर विंडो, एबीएस आणि एअरबॅग सारखी अनेक लेटेस्ट फीचर्स आहेत.