राजकारणहिंद सेवा मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ; पत्रकार चौकातल्या जागेबाबत...

हिंद सेवा मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ; पत्रकार चौकातल्या जागेबाबत कायदेशीर लढ्याला सुरुवात…!

spot_img

नगरच्या हिंद सेवा मंडळाला वक्फ बोर्डानं भाडेतत्त्वावर दिलेली जागा या संस्थेचे पदाधिकारी असलेले अजित ऊर्फ बाबुशेठ बोरा हे कवडीमोल भावानं विकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप हिंद सेवा मंडळाचे आजीव सभासद वसंत लोढा आणि माजी महापौर दीप चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय. यासंदर्भात ताबेमारी होत असून ती थांबविण्यासाठी लोढा आणि चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना एक निवेदनही दिलंय.

ते म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुचर्चित पत्रकार चौकातल्या जागेचा ताबा सोडण्याचा विषय सभासदांनी मंजूर केल्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून पोलीस अधीक्षकांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संस्थेला वकिलामार्फत नोटीसही देण्यात आली आहे.

यावेळी संजय घुले, हेमंत मुळे, अनिल गट्टाणी, मंदार मुळे उपस्थित होते. वसंत लोढा म्हणाले, की ‘हिंद सेवा मंडळाची स्थापना १९२२ सोसायटी रजिस्टेशन ॲक्ट १८६० – रजि नं. १७७० व बॉम्बे पब्लिक ॲक्ट १९५० नं.एफे ९ या नोंदणीकृत संस्थेच्या ताब्यात असलेल्या नगर भूमापन नं. ४३ अ याचे क्षेत्र ३ एकर २९ गुंठे नगर मनमाड रोड लगतची बहुमुलय मिळकत संगनमताने, कटकारस्थान रचून, विश्वासघात करण्याच्या दुष्ट हेतुने व संस्थेच्या सभासदांना व जनतेला फसवण्यासाठीच हा व्यवहार करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

या व्यवहारात सहभाग असलेले हिंद सेवा मंडळाचे विश्वस्त अजित सिमरतमल बोरा, अनंत रामचंद्र फडणीस, शिरीष दामोदर मोडक, संजय दादा जोशी व इतर विश्वस्तांनी सदर जागेचा ४० वर्षांचा करार शिल्लक असताना व सरकारी किंमत ३२ कोटी रुपये व बाजार भाव ४०० कोटी रुपये असताना जाणीवपूर्वक फक्त २५ कोटी रुपयांत ताबा सोडण्याबाबत बेकायदा ठराव घेत अनाधिकाराने विश्वस्त कायदा, वक्फ कायदा व भारतीय दंड संहितेचा भंग केला आहे. त्यामुळे संबंधितांविरुध्द या प्रकरणी कलम ४०६, ४०९, ४६८, ४७०, ४७१, १२० ब व ३४ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा’.

माजी महापौर दीप चव्हाण म्हणाले, की ‘ही जागा देवस्थान इनामी जमीन असल्याने त्या जमिनीची विक्री होऊ शकत नाही. तसेच सध्या असलेल्या मंडळाच्या कार्यकारिणीचा धर्मादाय आयुक्तांनी ‘चेंज रिपोर्ट’ मंजूर केलेला नाही. त्यामुळे त्यांना व्यवहार करता येत नाही. पहिल्यांदा या जागेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. मात्र अवघ्या सहा महिन्यांतच पदाधिकारी जागांचा ताबा सोडायला तयार झाले. त्यामुळे यामध्ये कुठं तरी पाणी मुरत आहे.

आम्ही सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग मागितले. मात्र ते अजूनही लिहिले गेले नाही. आम्ही आता ही जागा वाचवण्यासाठी लढा सुरु केला आहे. या जागेचे कच्चे व्यवहार सुरु झाले असून २५००० रुपये गुंठा ही जागा इतरांना विक्री होत आहे, असे समजते.

वसंत लोढा म्हणाले, ‘आम्ही ही जागा जाऊ देणार नाही. वक्फ बोर्डाकडे या जागेची नोंद आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. या विरोधात आवाज उठविल्यानंतर शहरातील अनेक मंदिरे, मस्जिद, चर्चच्या जागांची तसेच शहरातल्या ताबेमारीची प्रकरणं आली आहेत. त्याविरुद्धही आम्ही आवाज उठविणार आहोत’.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...