लेटेस्ट न्यूज़हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्यानिमित्त शिंगणापूरला लाखो शनिभक्तांची गर्दी...!

हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्यानिमित्त शिंगणापूरला लाखो शनिभक्तांची गर्दी…!

spot_img

नवग्रहांमध्ये श्रेष्ठ असलेल्या सूर्यपुत्र शनिदेवाचं नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूर इथं भव्य – दिव्य मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेर ऊन, वारा आणि पावसात शनिदेवाची स्वयंभू शिळा आहे. आजच्या हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्तानं लाखो भक्तांनी मनोभावे शनीदेवाच्या स्वयंभू शिळेचं दर्शन घेतलं. प्रवरा संगम (ता. नेवासा) इथून कावडीनं आणलेल्या गंगाजलानं शनिदेवाच्या शिळेवर अभिषेक घालण्यात आला. शनिमंदिरात सुश्राव्य अशा भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंचक्रोशीतल्या शनिभक्तांची मोठी गर्दी झाली होती.

वैकुंठवासी महंत उदासी महाराजांच्या प्रतिमेची यावेळी मिरवणूक करण्यात आली. गंगाजलाची कावड घेऊन येणाऱ्या अनेक तरुणांना पंचक्रोशीतल्या शनिभक्तांकडून यावेळी पिठलं, पुऱ्या आणि शिरा असा प्रसाद वाटप करण्यात आला. शनिशिंगणापूरचा परिसर यावेळी गर्दीनं फुलून गेला.

कोण आहेत शनिदेव…?

‘निलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम छाया मार्तंड संभूतं तम नमामि शनेश्वरम्’… असं ज्या शनिदेवाबद्दल म्हटलं जातं, ते शनिदेव यमराजाचे मोठे बंधू आणि सूर्यदेवाचे पुत्र असून नवग्रहांमध्ये ते श्रेष्ठ आहेत. साडेसातीच्या मानसिक त्रासापासून वाचण्यासाठी अनेकजण शनिदेवाची भक्ती करतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...